सलाहुद्दीन शेख
मुंबई विमानतळ येथील अदानी अंतर्गत कंत्राटी अस्थापना MS.MODERN VEER RAYS SECURITY FORCE P.LTD आस्थापनेतील असंख्य कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.
शिवसेना नेते, खासदार,भारतीय कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत, शिवसेना नेते, आमदार/विभाग प्रमुख ॲड. अनिल परब तसेच शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई ,यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय कामगार सेना, संयुक्त सरचिटणीस संजय कदम, चिटणीस संतोष कदम,यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय कामगार सेना चिटणीस पोपट बेदरकर यांच्या प्रयत्नाने सदर आस्थापनेतील असंख्य कामगारांनी शिवसेना भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारले.
सदर वेळी भारतीय कामगार सेने तर्फे MS.MODERN VEER RAYS SECURITY FORCE P.LTD आस्थापनेतील कामगारांना शुभेच्छा देत कामगारांच्या विविध समस्या जाणून घेत शिवसेना आपल्या सर्व मागण्याची पूर्तता करेल असे आश्वासन देण्यात आले या वेळी भा.का.से कार्यकारिणी सदस्य शिवाजी सीतापुरे, सलाहुद्दीन शेख, बाबू खोत,उपस्थित होते.