

सलाहुद्दीन शेख
“काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी. आरोपीकडून एकुण ०२ गावठी पिस्टल, ०४ जिवंत काडतूसे जप्त”
चालू असलेल्या सन उत्सोवाच्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे, मानसिंग पाटील यांचे आदेशांन्वये काळेपडळ पोलीस ठाणेचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पो. हवा. ७७३९ दाऊद सय्यद, पो. हवा. ७६५७ प्रतिक लाहिगुडे, पो. हवा. ८८० युवराज दुधाळ, पो.हवा.२०५४ प्रविण काळभोर, पोलीस अंमलदार ८२१३ श्रीकृष्ण खोकले, पो. अं.१००७० सद्दाम तांबोळी,
पो.अं.२४३३ महादेव शिंदे, पो. अं.८६४८ अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार शाहीद शेख, पो. अं. नासीर देशमुख, पोलीस अंमलदार नितीन ढोले, असे पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करत असतान पो.अं. नासीर देशमुख यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काळेपडळ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम नामेः अजिम ऊर्फ आंटया मोहम्मदहुसेन शेख, वय २५ वर्षे, रा.गल्ली नं.१२, कब्रस्तानसमोर, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा गौरी हॉटेल जवळ, पालखी मार्ग, हेवणपार्क कडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या आडबाजूस, महंदवाडी, पुणे येथे संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणेचे उद्येशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चिजवस्तु आपले जवळ बाळगुन वावरत असुन संशयित चिजवस्तु हि अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे. असे बातमी मिळताच, सदर ठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे यानी सदरबाबत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मानसिंग पाटील यांना कळविले असता त्यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी. अमित शेटे व वरील पोलीस स्टाफ असे गौरी हॉटेल जवळ, पालखी मार्ग, हेवणपार्क कडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या आडबाजूस, महंदवाडी, पुणे सर्व टिमला दिलेल्यां सुचनांप्रमाणे जावुन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असतां, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे अजिम ऊर्फ आंटया मोहम्मदहुसेन शेख, वय २५ वर्षे रा.गल्ली नं.१२, कब्रस्तानसमोर, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा पोलीसांना पाहून संशयितरित्या व कावरे बावरे स्थितीत आढळुन आलेने सर्व टीमने चोहोबाजूने त्यास घेराव घालून ताब्यांत घेतले. त्यावेळी त्यांची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ०२ पिस्टल व ०४ जिवंद राऊंड असा एकुण ८१.६००/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे. तरी नमूद इसम अजिम ऊर्फ आंटया मोहम्मदहुसेन शेख याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपीतास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा.अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त साो. धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पो. हवा. दाऊद सय्यद, पो.हवा. प्रतिक लाहिगुडे, पो.हवा. युवराज दुधाळ, पो. हवा. प्रविण काळभोर, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले, पो.अं. सद्दाम तांबोळी. पो. अं. महादेव शिंदे, पो.अं. अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार शाहीद शेख, पो. अं. नासीर देशमुख, पोलीस अंमलदार नितीन ढोले, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.