विजय राठोड

कक्ष 11 गुन्हे शाखा, कांदिवली, मुंबई.

१. केसचा प्रकार :- 2 वर्षापासून पाहिजे असलेल्या आरोपीत इसमास ताब्यात घेतलेबाबत.

2. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव व पत्ता:- सुमित सुरेश आदवडे वय 34 वर्षे, राठी, मुक्काम पोस्ट भूम आदवडेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र.

3.हस्तगत मालमत्ता:- Nil.

4. आरोपींचा पुर्वाभिलेख:-
1. दादर रेल्वे पो. ठाणे गु. र क्र 213/2014 कलम 420 भादवि.
2. आर.ए.के मार्ग पो ठाणे गु.र.क्र. 148/2016 कलम 363 भा.दं.वि.

5. थोडक्यात हकीगत:- सप्टेंबर 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीत फिर्यादी यांना रेल्वे खात्यात नोकरीस लावतो असे सांगुन व फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी व त्यांची बहिण श्वेता, शितल व मित्र जयेश यांच्याकडुन एकुण 6,42,300/- रूपये घेऊन फसवणुक केली म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वर नमुदप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
कक्ष-11 चे पो.ह प्रविण सावंत यांना गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, वरिल गुन्हयातील पाहिजे आरोपी हा चिपळुन, रत्नागिरी येथे आहे.
मिळालेल्या माहितीचे व आरोपीच्या मोबाईलचे विश्लेषण करून, सदर बाबत वरिष्ठांना माहिती देवून, आज रोजी, कक्ष-11 चे पो.उ.नि कांबळे, पो.ह. सावंत व पो.ह. खताते यांनी मानवी कौशल्याद्वारे व तांत्रीक विष्लेशणाद्वारे अचुक सापळा लावून नमुद इसमास स्वागत लॉजच्या बाहेर, चिपळुन एस्टी स्टँडच्या बाजुला, चिपळुन, रत्नागिरी परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले.
नमुद इसमास कक्ष-11 कार्यालय येथे आणुन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने नमुद गुन्हयातील त्याचा सहभाग असल्याची माहिती दिली.
ताब्यात घेतलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी कांदिवली पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विनायक चव्हाणए
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कक्ष.11, कांदिवली, मुंबई.