मुंबई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांचे मुंबई पोलिसांना निर्देश

संदिप कसालकर
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान असंख्य सार्वजनिक मंडळांनी उंच अश्या देवीच्या मूर्तींची स्थापना केली आहे. आगामी येणाऱ्या २४ ऑक्टोबर २०२३ ते २६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान दुर्गामातेच्या मुर्तींचे विसर्जन होणार आहे. अश्या परिस्थितीत काही लोक विसर्जन झाल्यानंतर अर्ध्या विरघळलेल्या मूर्तींचे चित्रीकरण तसेच चित्रफीत काढतात आणि सोशल मीडिया वर व्हायरल करत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा अश्या अर्धवट अवस्थेत असलेल्या मूर्ती पाहून धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. याचाच गांभीर्याने विचार करून मुंबई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी पोलिसांना अश्या लोकांवर कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता कोणीही अश्या प्रकारचे चित्रीकरण केल्यास त्यांच्यावर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये ( १९७३ चा कायदा क. II) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.