संदिप कसालकर
अलीकडे वाढत असेलेला मॅन-इन-द-मिडल (MitM) हल्ला हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये हल्लेखोर गुप्तपणे एकमेकांशी थेट संवाद साधत असल्याचा विश्वास असलेल्या दोन पक्षांमधील संदेश गुप्तपणे रोखतो आणि रिले करतो. हल्ला हा एक प्रकारचा छेडछाड आहे ज्यामध्ये हल्लेखोर अडवतो आणि नंतर संपूर्ण संभाषण नियंत्रित करतो. याच पद्धतीचा वापर करत मुंबईतील एका शाळेची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
मुंबईतील एका नामांकित इंटरनॅशनल स्कुलची आर्थिक व्यवहारात ८७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांना मिळताच मुंबई गुन्हे शाखेला सायबर पोलीसांच्या मदतीने फसवणुकीतील ८२.५५ लाख रुपये परत मिळविण्यात यश मिळाले. इंटरनॅशनल स्कुलने कॅफेटेरियाचे बांधकामाचे साहीत्य पुरवठा करण्यासाठी UAE मधील Euro phone Acoustics या कंपनीशी करार पक्का केला असता त्या कंपनीने त्यांच्या अधिकृत ई-मेल आय.डी वरून कंपनीचे UAE मधील बैंक डिटेल्स व्यवहाराकरिता दिले होते. परंतु एका अज्ञात इसमाने त्या मेल आय डी सारखा दिसणारा बनावट ईमेल आयडी तयार करून, USA मधील नविन बैंक डिटेल्स स्कुलला पाठविले व सदर स्कुलची एकुण रूपये ८७, २६,९९५.६५/- ची आर्थिक फसवणुक केली म्हणून मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. २०/२०२४ कलम ४१९,४२०,४६५, ४६७,४६८,४७१,३४ भादंविसह कलम ६६ ड माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयात मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ तांत्रिक व पारंपारिक तपासाची कार्यवाही करून संबधित नोडल बँक अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क करून सदर फसवणुकीच्या रक्कमेपैकी एकुण रूपये ८२,५५,९५५/- एवढी रक्कम इंटरनॅशनल स्कुलच्या बँक खात्यात परत मिळविण्यात यश मिळविले आहे.
सदरची कार्यवाही विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई शहर, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई शहर, लखमी गौतम, सह पोलीस आयुक्त, शशीकुमार मीना, अपर पोलीस आयुक्त, दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे, आबुराव सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे, मध्य विभाग, वरळी मुंबईचे प्रभारी पोलीस निरीक्षक मौसमी पाटील, तपासी अधिकारी सपोनि मानसिंग वचकल, पो.ह.क्र. ०३८७६/अभिजीत गोंजारी, पो.ह.क्र. ३३२९९/संतोष गावडे, पोशिक्र. ०८०३०८ शितल सावंत यांनी पार पाडली आहे. भविष्यात अश्या प्रकारच्या गुन्हयापासुन वाचण्याकरिता नागरिकांनी खालील काळजी घ्यावी • कंपनीची संगणक साधनसामुग्री ही Advanced Technology ने वेळोवेळी protect व update करावी • ज्या कंपनीशी व्यवहार करण्यात येतो त्या कंपनीची योग्यता व अर्हता नीट तपासुनच करार करावा. • करारामध्ये नमुद ईमेल आयडी व बँक डिटेल्स याची दुहेरी खात्री करूनच व्यवहार करण्यात यावा. • कराराव्यतिरिक्त ईमेल आयडी व बैंक डिटेल्समध्ये अचानक बदल केले गेले तर संबधित कंपनीबरोबर व्यवहारापुर्वी खात्री करा. • बँक व्यवहारांदरम्यान ईमेल आयडी, बँक खाते क्रमांक, IFSC Code, शाखा इ. नीट तपासा. कोणतीही फसवणुक झाल्यास त्वरीत सायबर हेल्पलाईन १९३० ला संपर्क साधावा.