![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2024/05/drugs.jpg)
![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2024/05/drugs-768x1024.jpg)
संदिप कसालकर
कुरियर मध्ये ड्रग्स असल्याचे सांगून 8 लाख 43 हजार रुपयाची ऑनलाइन फसवणूक! फसवणूक झालेली सर्व रक्कम Golden Hour मध्ये परत मिळवून गुन्ह्यातील आरोपीस राजस्थान येथून अटक करुन गुन्हा उघड करण्यात ओशिवरा पोलीस ठाण्याचे यश.
मुंबई: 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:45 ते 10:45 चे दरम्यान फिर्यादीला राहत्या घरी अनोळखी मोबाईल धारकाने फेडेक्स कुरिअर सर्विस चा कस्टमर बोलत असल्याचे सांगून तसेच त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने सायबर पोलीस अधिकारी एअरपोर्ट मुंबई येथून बोलत असल्याचे सांगत, तुमच्या नावाने अमली पदार्थ असणारे पार्सल तस्करीचा गुन्हा दाखल झाला आहे त्याकरिता फिर्यादीचे बँक अकाउंट ची तपासणी करावयाची असल्याचे सांगून काही वेळ करता त्यांच्या बँक खात्यातील रक्कम दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास भाग पाडून एकूण आठ लाख 8,43,000/- रुपयांची फसवणूक केली म्हणून अज्ञात इसमाविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यास फिर्यादी यांचे तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता.
![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2024/05/WhatsApp-Image-2024-05-17-at-3.26.51-PM.jpeg)
ओशिवरा पोलीसांनी तात्काळ प्राप्त माहितीच्या आधारे व फिर्यादी यांच्या बँकेची बँक शिकण्याची पाहणी केली असता तक्रार यांची फसवणूक झालेली रक्कम ही PNB बँकेच्या खात्यामध्ये वळते झाल्याने तात्काळ PNB बँकेच्या नोडल अधिकारी /मॅनेजर यांच्याशी संपर्क करून व ईमेल द्वारे पत्र व्यवहार करून तात्काळ फिर्यादी यांची फसवणूक झालेली 8,43,000/- रू. सर्व रक्कम गोठवण्यात यश प्राप्त केले असून फिर्यादी यांना फसवणुकीची रक्कम परत करण्यात आली आहे. तसेच सायबर पथकाने नमुद गुन्हयातील आरोपीतांनी वापरलेले बॅंकेचे खाते क्रमांकची माहिती प्राप्त करून व तांत्रिकदृष्ट्या तपास करून गुन्हयातील आरोपीत इसम हा रामपुरा नेवला, तहसील सुरतगड, जिल्हा श्रीगंगानगर ,राज्य राजस्थान येथे असल्याचे समजल्याने वरिष्ठांच्या पुर्वपरवानगीने राजस्थान येथे जावुन स्थानिक पोलीस ठाणेच्या मदतीने आरोपीतांचा शोध घेवुन त्यास अटक करून मा. न्यायालयात हजर करून ट्रांजिट रिमांड घेऊन त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास मान्य न्यायालयासमोर हजर केली असता माननीय न्यायालयाने दि 17/05/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे
![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2024/05/WhatsApp-Image-2024-05-17-at-3.26.51-PM-1-1024x768.jpeg)