अयाज़ खान

शेअर मार्केट मध्ये भरघोस नफ्याचे आमिष देणाऱ्या गुंतवणुकीपासून सावधान!

आरोपीने स्वतःची बनावट सेबी रजिस्टर कंपनी व त्याचे बनावट ओळखपत्र दाखवून लोकांना शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतविल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले व गुंतवणूकदारांची फसवणूक केली.

मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेने फिर्यादीच्या तक्रारीवरून तपास करुन मध्यप्रदेश येथे आरोपीस अटक केली. नमूद आरोपीकडून अंदाजे १९०० ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम रुपये २५ लाख हस्तगत करण्यात आली आहे. तसेच सर्वसाधारणपणे ४०० ते ५०० लोकांची फसवणूक करुन आरोपीने काही करोडोपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक केली असण्याची शक्यता असून याविषयी पुढील तपास सुरु आहे.