संदिप कसालकर
जोगेश्वरी: ५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजता, मेघवाडी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गौस मोहीद्दीन शहाबुद्दीन सय्यद नावाच्या गुन्हेगाराला जेरबंद करून त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि दहा लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली.
मेघवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सम्राट वाघ, पोलीस हवालदार माने तसेच पोलीस शिपाई बागुल यांना गुप्त माहिती मिळाली होती की, गौस शहाबुद्दीन जोगेश्वरीच्या रामगड परिसरात देशी पिस्तुल विक्रीसाठी आणणार आहे. यावर कारवाई करत पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला रंगेहाथ पकडले.”गुन्हेगाराच्या तपासात मेघवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याच्या गुन्हेगारी इतिहासाची माहिती घेतली असून तो आधीच गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान सदर कारवाई परिमंडळ १० चे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
10 लाख रोख आणि गावठी पिस्तूल! गुन्हेगाराचा दहशतीचा डाव मेघवाडी पोलिसांनी केला फेल!
Related Posts
सोशल मीडियावर सतत असता? मग हे धोके माहिती असायलाच हवेत! मेघवाडी पोलिसांचे इशारे!
संदिप कसालकरमुंबई : सायबर गुन्हे आणि बालकांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज दि. 06 फेब्रुवारी 2025 रोजी मेघवाडी पोलिसांच्या वतीने श्रमिक विद्यालयात सायबर अवेअरनेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात…
कोनगाव पोलीस ठाणे, ता. भिवंडी आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने गुह्यातील जप्त व रेकॉर्ड वरील बेवारस ५४ वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध
सलाहुद्दीन शेख कोनगाव पोलीस ठाणे, ता. भिवंडी आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने गुह्यातील जप्त व रेकॉर्ड वरील बेवारस ५४ वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध कोनगाव पोलीस ठाणे येथे जप्त रेकॉर्डवरील/बेवारस…