प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : गोपनिय बातमीदारांकडुन प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक ८/१२/२०२५ रोजी २२.५० वा. कल्याण पूर्वेतील आडवली, ढोकळी, हाजीमंलग रोड, येथील काका ढाबा, येथे असलेल्या श्री. गजानन रेसिडेन्सी, दिनकर विहार को.ऑप हौ.सोसायटी लिमि. रुम नं. ००२, डी-विंग याठिकाणी इसम नामे आकिब इकबाल बागवान (वय: ३३ वर्षे) हा एकुण १०८ ग्रॅम ८ मिलीग्रॅम वजनाचा १०,८८,०००/- रुपये किंमतीचा एम.डी.(मफेड्रोन) हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता जवळ बाळगला असताना व ५०,०००/- रुपये किंमतीची विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्टल अग्नीशस्त्र बेकायदेशीररित्या जवळ बाळगुन ठेवले असल्याने मिळुन आला म्हणुन आरोपी नामे १) आकिब इकबाल बागवान याच्या विरुध्द मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १५०२/२०२५ एनडीपीएस ऍक्ट १९८५ कलम ८ (क), २१ (क), सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह म.पो. कायदा कलम ३७ (१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन बाजारपेठ पोलीस स्टेशन, कल्याण गुन्हा रजि नं. ५०५/२०२५ एन.डी.पी.एस कलम ८ (क) २२ (ब) व ५६०/२०२५ एन.डी.पी.एस कलम ८ (क) २२ (क) या दोन गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातीलं अटक आरोपी याच्याकडे चौकशी केली असता सदरचे अग्नीशस्त्र त्याने भरत शत्रुध्न यादव याच्याकडुन घेतल्याचे सांगितले.

त्यामुळे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे २) भरत शत्रुध्न यादव याचा तांत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध घेवुन त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अंगझडती मध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले.

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकुण २ आरोपीना अटक करण्यात आलेली असुन त्यांच्याकडुन १०८.८ ग्रॅम वजनाचा एम.डी.(मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व एक अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस असा एकुण ११,४१,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे, नेम – खंडणी विरोधी पथक, ठाणे हे करीत आहे.

सदरची कारवाई श्री.अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध – २, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, सपोउपनिरी. भोसले, कानडे, पोहवा. ठाकुर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावस्कर, चापोहवा. हिवरे, पोशि. वायकर, पाटील, शेजवळ, मपोशि. भोसले यांनी केली आहे.