

प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण : परीमंडळ-३ कल्याण मध्ये अवैध धंदयावर कारवाई करण्याकरिता विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन सदर पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण व पोलीस पथक हे संयुक्तरित्या खाजगी वाहनाने गस्त करीत असताना
१) मानपाडा पोलीस स्टेशन हददीत सुदर्शन मार्बल समोर, सावित्रीबाई फुले नाटयगृह जवळ, एम.आय.डी.सी. रोड, डोंबिवली पूर्व येथे एक इसम नामे सनिल श्रीनाथ यादव, (वय: २५ वर्षे) राहणार. रूम नं २०२, नांदीवली टेकडी, आनंद बंगला डोंबिवली (पुर्व) हा त्याच्या ताब्यात एकुण ८.४८ ग्रॅम वजनाचा १६,५००/- रूपये किंमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उददेशाने जवळ बाळगलेला असल्याचा मिळुन आल्याने त्याचेवर मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १३६/२५ एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८ (क), २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२) बाजारपेठ पोलीस स्टेशन हददीत दुर्गामाता चौक, भटेला तलाव येथील मोकळ्या जागेत, कल्याण पुर्व येथे इसम नामे शंकर महादेव गिरी, (वय: ४६ वर्षे), धंदा मजुरी राहणार. मुपो. टाकळी अम्या, ता. आष्टी, जि. बीड हा त्याच्या ताब्यात एकुण ९ किलो ९५० ग्रॅम वजनाचा १,००,०००/- रूपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळगलेला असल्याचा मिळुन आल्याने त्याचेवर बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १३२/२५ एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३) डोंबिवली पोलीस स्टेशन हददीत राजाजी पथ, स्वामी नारायण मंदिराच्या बाजुस असलेल्या मोकळ्या जागेत, रामनगर, डोंबिवली पुर्व येथे इसम नामे १) सचिन एकनाथ कावळे (वय: ३२ वर्षे), राहणार. रूम नं ०२, वसंत केणे चाळ, प्रगती कॉलेज मागे, डी.एन.सी. रोड डोंबिवली पूर्व २) अमन वीरेंद्र गुप्ता उर्फ पप्पु (वय: १६ वर्षे), राहणार. रूम नं ०१, सुगंधी चाळ, दत्तनगर, डोंबिवली पुर्व यांनी मिळून त्यांच्या ताब्यात एकुण २३.५३ ग्रॅम वजनाचा एम.डी. हा अंमली पदार्थ व १० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ एकुण ९३,९४३/- रूपये किंमतीचा अंमली पदार्थ विक्री करीता सोबत बाळगल्याचे मिळून आल्याने त्यांच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ११७/२५ एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८ (क) सह २० (अ), २१ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच परिमंडळ-३ कल्याण मध्ये १ जानेवारी २०२५ ते आजपर्यंत विशेष अंमली पदार्थ कारवाई पथकामार्फत एकुण १३ गुन्हे दाखल असुन सदर गुन्ह्यात १९ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडुन ६३ ग्रॅम एम.डी. पावडर, २३२ कोडीनयुक्त बॉटल व नशेच्या गोळ्या तसेच ४७ किलो ०४४ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकुण १२ लाखापेक्षा जास्त रुपये किंमतीचा अंमली पदार्थ असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर श्री.आशुतोष डुंबरे साो., मा.पोलीस सह आयुक्त, श्री.ज्ञानेश्वर चव्हाण साो., मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री.संजय जाधव साो., यांचे आदेशाने, श्री. अतुल उत्तमराव झेंडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३ कल्याण, साहाय्यक पोलीस आयुक्त श्री.सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. प्रशांत चव्हाण, पोना. शांताराम कसबे, पोशि. गौतम जाधव, राजेंद्र सोनावणे यांच्या विशेष पथक तसेच डोंबिवली पोलीस ठाणेचे वपोनि. गणेश जावदवाड, सपोनि. कोकरे, मानपाडा पो. स्टे.चे पोनि. गुंड, सपोनि. राळेभात व बाजारपेठ पोलीस ठाणेचे पोनि. दुकले, सपोनि राठोड यांचेकडुन यशस्वीपणे कामगिरी करण्यात आली आहे.