एस.डी चौगुले
काल विलेपार्ले प्रार्थना समाज रोड येथील ऋषिकेश सोसायटीच्या गच्चीवरील प्लॅस्टिक शेडला व सर्व्हिस रोड येथील मोकळ्या जागेत टाकलेले लाकडी सामान व झाडांना फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली.
यावेळी सदर जागी फायर ब्रिगेड येण्यास विलंब लागल्यामुळे युवासेना विभाग अधिकारी सिद्धेश पवार, उपशाखा अधिकारी संकेत नर श्री जय हनुमान व्यायाम शाळा (रामवाडी) संस्थेचे वैभव घोलम ,
संजय हुमणे, सुहास भोवड , मंदार पवार , विनोद मांढरे , दिलीप चौघुले , संतोष हुमणे, प्रसाद शिंदे यांनी सदर सोसायटीतील नागरिकांना खाली उतरवून मेन स्विच बंद करत त्वरित वॉटर टँकर उपलब्ध करून पाणी मारत अर्धी आग विझवण्यात आली,
सदर जागी फायर ब्रिगेड पोहचल्यावर त्वरित टँकर संत जनाबाई रोड येथे घेऊन जात सर्व्हिस रोड प्लॉट वरील आग सुद्धा पाणी मारून विझवून टाकण्यात आली. सदर दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही, यावेळी सर्व स्थानिक नागरिक यांनी सर्व पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते यांचे आभार मानून आपल्यामुळे मोठी दुर्घटना टळली व फायर ब्रिगेड अधिकारी यांनीही सर्वांचे कौतुक केले.
प्रार्थना समाज रोड येथील वॉटर टँकर सप्लायर विनोद मांढरे यांनी आग लागल्याची दुर्घटना कळताच कार्यतत्परतेने त्वरित आपले पाण्याचे टँकर उपलब्ध केल्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद.
विलेपार्लेतील अनेक सोसायटीच्या गच्चीवर पावसाळी प्लॅस्टिक शेड टाकलेल्या अजून ही काढण्यात आलेल्या नाहीत यावर जळता फटाका पडला की आगीच्या अनेक दुर्घटना घडत आहे.
त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व फायर ब्रिगेड यांनी मोठी दुर्घटना घडण्याअगोदर सर्व सोसायटीना शेड काढण्याचे निर्देश द्यावेत अशी सूचना शिवसेना युवासेना तर्फे देण्यात आली आहे.