संजय सावर्डेकर

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक शेवगाव येथे गावठी कट्टा, जिवंत काडतुसासह एक जण ताब्यात

शेवगाव, ता.

गावठी कट्टा व जिवंत काडतूस चाळगणाऱ्यास शहरातील पाथर्डी रस्त्यावर गाडगेबाबा चौकामध्ये सापळा बचून पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

जहीर ऊर्फ जज्या नवाब शेख (वय २०, रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव) असे आरोपीचे नावे असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल संच असा एकूण ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल श्याम बाबासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख याच्याविरुध्द भारतीय शस्व अधिनयम कलमाप्रमाणे (आर्म ॲक्ट) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे त्यांना एक इसम कंबरेला गावठी कट्टा

लावून फिरत असल्याची खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, पो. हवालदार सुधाकर दराडे, पो. कॉ. श्याम गुंजाळ, ज्ञानेश्वर सानप, कृष्णा मोरे यांनी गुरुवार, ता.२८ रोजी १२ वाजण्याच्या सुमारास शहरातील पाथर्डी रस्त्यावरील गाडगेबाबा चौकामध्ये सापळा लावला. रात्री साडेबाराच्या सुमारास तो एका हातगाडीसमोर उभा दिसला. पोलिसांना बघितल्यावर तो पळून जाण्याच्या तयारीमध्ये असतांनाच

पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून शेख यास गावठी कट्टासह ताब्यात घेतले. त्यास

न्यायालयात हजर केल्यानंतर जास्तीत जास्त पोलिस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर शेख याने गावठी कट्टा कुठे खरेदी केल्याची माहिती घेऊ. – दिगंबर भदाणे, पोलिस निरीक्षक

त्याला सुधाकर दराडे व श्याम गुंजाळ यांनी पकडले. त्याची पंचांसमक्ष झाडाझडती घेतली असता डाव्या बाजूच्या कमरेला एक गावठी कट्टा, मॅकझिनमध्ये तीन जिवंत काडतुसे व दोन मोबाईल संच असा एकूण ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहेत.