विजय राठोड

➡️ आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रु. 01,09,550/- तक्रारदार यांना परत मिळवून दिलेबाबत दहिसर पोलीस ठाणेची उत्कृष्ट कारवाई
➡️ घटनेची थोडक्यात हकीकत
– तक्रादार नामे श्री . विपीन लक्ष्मणराव माहुरकर, वय – 48 वर्षे, धंदा- डॉक्टर, यांचा स्वतःचा दातांचा दवाखाना आहे .त्यानुसार दि. 11/01/2024 रोजी सकाळी 11.00 वा दरम्यान तक्रादार यांना 9824723979 हया अनोळखी क्रमांकावरून त्यांच्या 49 हया नं. वरती दिपावली वर्मा नावाच्या महिलेचा फोन आला व समोरून बोलणा-या महिलेने ‘‘ मी आर्मीमधुन बोलत आहे व आम्हाला आमच्या काही सैनिकांना तुमच्या दवाखान्यात क्लिनींगकरीता पाठवायचे आहे तर तुम्ही आम्हाला काही माहीती दया.’’ त्याअनुशंगाने तक्रादार यांनी सदर महिलेला त्यांच्या साऊथ इंडीयन बॅक खाते क्र. 04 व कोटक महिंद्रा बॅक खाते क्र. 7 ची सर्व माहिती दिली. त्यानंतर सदर महिलेने सांगीतले कि, गेटपास बनवण्यासाठी व आर्मीचे नियमांसाठी तुम्हाला 50 रू. भरावे लागतील. त्यानुसार तक्रादार यांनी 50 रू. पाठवले. त्यावर तक्रादार याना 100 रू. परत आले. त्यानंतर सदर महिलेने तक्रादार यांना 50,000 रू. व 49,000 रू पाठवायला सांगीतले त्यानुसार तक्रादार यांनी त्यांच्या साऊथ इंडीयन बॅक खाते क्र. 04 यामधुन 50,000 रू. व 49,000रू पाठवले. त्यानंतर तक्रादार यांनी पैसे परत मागीतले असता सदर बॅकेमध्ये पैसे रिफंड करता येत नसल्याने तुमचे दुस-या बॅकेचा खाते क्रमांक मागीतला असता तक्रादार यांनी कोटक महिंद्रा बॅक खाते क्र. 7 ची सर्व माहिती दिली व त्यांच्या सांगण्यानुसार सदर कोटक महिंद्रा बॅक खाते क्र. *07 मधुन 10,000 रू. पाठवले. त्यावर सदर महिलेने रू. 1000/- तक्रादार यांना परत पाठवले. त्यानंतर तक्रादार यांना कोणताही रिफंड आला नाही त्यावरून तक्रादार यांना लक्षात आले कि, माझी आर्थिक फसवणुक झाली आहे. तक्रारदार तात्काळ दहिसर पोलीस ठाणे येथील सायबर् सेल येथे हजर होताच PSI राजेश गुहाडे यांचेकडे तक्रार केली असता,तक्रारदार यांच्या गेलेली रक्कम चा शोध घेतला घेऊन तक्रारदार यांची रक्कम ही ,कोटक महिंद्रा बँक येथे गेल्याचे समजले त्यानुसार PSI गुहाडे यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या नोडलशी प्रथमतः कॉलद्वारे व नंतर मेल द्वारे संपर्क करून सदर अकाउंट फ्रिज करण्याबाबत सांगितले व फॉलोअप घेऊन तक्रारदार यांचे आर्थिक फसवणूक झालेले रुपये 1,09,950 /- त्यांना परत मिळवून देण्यात यश आले आहे.
सदर कामगिरी स्मिता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 12 , किशोर गायके सहाय्यक पोलीस आयुक्त,दहिसर विभाग,दहिसर , राणी पुरी प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक,दहिसर पोलीस ठाणे , दिवसपाळी पर्यवेक्षक सहा. पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे यांच्या मार्गदर्शनाने सायबर अधिकारी राजेश गुहाडे,पोलीस उपनिरीक्षक (सायबर सेल) , पोशी नितीन चव्हाण , मपोशी सुप्रिया कुराडे , पोशी श्रीकांत देशपांडे यांनी सदर रकमेचे तांत्रिक विश्लेषण करून शोध घेऊन तक्रारदार यांना त्यांची आर्थिक फसवणूक झालेली रक्कम परत केली आहे .

➡️ ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम 1,09,950/- रुपये
➡️ परत मिळवून दिलेली रक्कम 1,09,950/- रुपये