मुंबईमध्ये दहशत माजविणाऱ्या कुविख्यात गुंडास गुन्हे शाखा ४ ने अटक केली आहे. दिनांक ०६ एप्रिल २०२४ रोजी कोकरी आगार, अँटॉपपहिल परिसरात पहाटे ०५:४० वाजताच्या सुमारास मोटारसायकल वरुन आलेल्या अज्ञात इसमाने एका इसमावर गोळीबार करून पसार झाल्याची घटना घडली होती. या अज्ञात आरोपीचा शोध अँटॉपपहिल पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखे मार्फत घेण्यात येत होता.

दिनांक ०९ एप्रिल २०२४ रोजी गुन्हे शाखा, कक्ष -४ ने तांत्रीक बाबींचा आभ्यास करुन तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी स्वत:चे अस्तित्व लपवून डोंबीवली परिसरात लपून बसला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबवली परिसरातील कोळेगांव, कटई नाका या ठिकाणी गुप्तपणे सापळा रचला आणि आरोपी पळून जाण्याची संधी न देता घेरावा घालून व झडप टाकून ताब्यात घेतले. अटक आरोपीचे नाव विवेक देवराज शेट्टीयार असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या काळया रंगाच्या सॅक बॅगमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व सहा जिवंत काडतूसे व एक रिकामी पुंगळी तसेच त्याने गुन्हयाच्या समयी वापरलेले कपडे मिळून आले.
आरोपी विवेक शेट्टीयारची सखोल चौकशी केली असता त्याला न्यायालयाने कोव्हीड कालावधित अभिवचन रजेवर सोडले होते. त्यानंतर तो पुन्हा कारागृहामध्ये हजर झालेला नव्हता. त्याच्या विरोधात खुन, खुनाचा प्रयत्न व अग्निशस्त्र जवळ बाळगणे अशा प्रकारचे एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल असल्याची व त्याच्या विरोधात वेग-वेगळया न्यायालयाने अजामीनपात्र वॉरन्ट देखील जारी केली आहेत.

नजीकच्या काळामध्ये आरोपी विवेक शेट्टीयार आणखी दोन इसमांवर जिवघेणा हल्ला करणार असल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशी मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी – मध्य), चेतन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, पो. नि. अजित गोंधळी, स.पो.नि. समीर मुजावर, स. पो. नि. अजय बिराजदार, पो.उप.नि. शामसुंदर भिसे, पो.उ.नि. भावे, स.फौ. वशिष्ठ कोकणे, स.फौ. शेडगे, पो.ह. शरद शिंदे, पो.ह. निर्भवणे, पो. ह. संजय तुपे, पो. ह. देवार्डे, पो.शि. संजय गायकवाड, पो.शि. प्रमोद पाटील, पो.शि. शुभम सावंत, पो.शि. सय्यद, पो.शि.चा. प्रसाद गरवड व चव्हाण यांनी पार पाडलेली आहे.