

सलाहुद्दीन शेख
बेवारस व्यक्तिचा मृतदेह आढळल्या बाबत.सहार पोलीस ठाणे कडून आवाहन,
दिनांक 06/09/2025 रोजी सहार पोलीस ठाणे, मुंबई. च्या हद्दित एक अनोळखी इसमः मुकुंद हॉस्पीटलच्या समोर मेट्रो लाईनच्या खालील बाजुस बस स्टॉप जवळ मरोळ पाईप लाईन अंधेरी पु या ठिकाणी बेशुध्द अवस्थेत एक अनोळखी कचरा उचलणारा इसम बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्याला सहार मोबाईल १ च्या मदतीने ताबडतोब उपचार करण्याकरिता कुपर रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन ३.३२ वा दाखल केले असता, दिनांक 6/9/2025 रोजी दाखल पुर्व मयत घोषीत केले आहे.
बेवारस मयताचे वर्णन
बांधा सडपातळ, उंची ५ फुट ६ इंच, कैस व दाढी वाढलेले ,केस-पांढरी ,वय अंदाजे ६० ते ६५ वर्ष.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की
सदर इसमाबाबत तसेच त्याचे नातेवाईक यांबाबत काही माहिती असल्यास किवा माहिती मिळाल्यास सहार पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा –
पोलीस उपनिरीक्षक राहुल उगले –8830907545