सलाहुद्दीन शेख

रिक्षातून प्रवासादरम्यान हरवलेला मोबाईल अंधेरी पोलिसांकडून शोधून परत

अंधेरी परिसरात रिक्षातून प्रवास करत असताना फिर्यादी यांचा मोबाईल फोन हरवला होता. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची तात्काळ दखल घेत अंधेरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व तपासाच्या आधारे संबंधित रिक्षाचा शोध घेतला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना सदर रिक्षा व त्यातील हरवलेला मोबाईल फोन शोधण्यात यश आले.

अंधेरी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादी यांना त्यांचा मोबाईल सुरक्षितपणे परत केला. पोलिसांच्या या तत्पर व कार्यक्षम कामगिरीबद्दल फिर्यादी यांनी समाधान व्यक्त करत अंधेरी पोलिसांचे आभार मानले आहेत.