संतोष चौगुले

अंमली पदार्थ विरोधी पथक, घाटकोपर युनिट यांनी गोरेगाव चेकनाका बसस्टॉप येथे २ विदेशी नागरिकांना अंदाजे १७.४० लाख किंमतीच्या ८७ ग्रॅम मेफेड्रोन या अंमली पदार्थाच्या साठ्यासह अटक केली.

अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकांना अंमली पदार्थांच्या तस्करीत यापूर्वी देखील अटक करण्यात आली होती व ते सध्या जामिनावर बाहेर होते. दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.