जोगेश्वरी पूर्वेला एका खासगी प्रकल्पातील झोपडीधारकाने भाडे न मिव्ठाल्याने विष पिऊन आत्महत्या
करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत झोपडी धारक अहमद हुसेन शेख (४६) यांचा
जोगेश्वरीतील महापालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात गुरुवारी सकाठ्ठी मृत्यू झाला. अहमद यांची झोपडी ओमकार डेव्हलपर या कंपनीने प्रकल्पासाठी निष्कासित केली होती.

अहमद यांचे चार वर्षापासून त्या डेव्हलपरकडून भाडे थकले होते. या झोपडीधारकाने गेल्या काही महिन्यांपासून ओमकार डेव्हलपरच्या कार्यालयासमोर भाडे मिळविण्यासाठी फिरत होता, मात्र त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर बुधवारी सायंकाळी त्यांनी विकासकाच्या कार्यालयाबाहेर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना तात्काळ रुगणालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. अहमद यांच्या
कुटुंबीयांनीही पोलिसांना आपला जबाब दिला आहे. यामुढे ओमकार डेव्हलपरच्या व्यवस्थापनावरही प्रश्न निर्माण झाले असून, झोपडी धारकांच्या हितासाठी आवश्यक कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Other Story