सलाहुद्दीन शेख

दहिसर वाहतूक विभागाकडून जाहीर आवाहन करण्यात आले आहे की दहिसर वाहतूक विभागाच्या आवारात एकूण सन 2023 च्या 46 दुचाकी वाहने सन 2024 च्या 58 दुचाकी वाहने सन 2018 ते 2024 च्या 60 ऑटो रिक्षा वाहने व 04 चार चाकी वाहने हे बऱ्याच वर्षापासून पडलेले

आहेत त्यामुळे जनतेच्या आरोग्यस धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सदरची वाहने ज्या मालकांची असतील त्यांनी

आपल्या वाहनांची कागदपत्रे दाखवून चार दिवसात घेऊन जाणे अनिर्वाय आहे अन्यथा दहिसर वाहतूक विभागामार्फत वाहनांची शासकीय विल्हेवाट लावण्यात येईल तसेच पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल अशी जाहीर सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे दहिसर वाहतूक विभाग

यांच्या मार्फत काढण्यात आलेली आहे तसेच ज्यांची वाहने असतील त्यांनी खालील प्रमाणे संपर्क करण्याकरिता नंबर दिलेले आहेत
रत्नेश पालांडे 8082034777