एस. डी चौगुले
मुंबई घाटकोपर येथे दुसरी राज्यस्तरीय कराटे चॅम्पियन 2023 वर्ल्ड शोतोकान कराटे असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेचे मुख्य आयोजक शिहान कमलेश कसबे, तसेच सेन्साई मोहन थापा, सेन्साई बान बहादुर थापा, सेन्साई अभिजीत बनेकर, सेन्साई अजय सरोदे, सेन्साई रुलाकशी शर्मा, यांनी या स्पर्धेमध्ये आयोजक व पंचाची भूमिका बजावली त्यांना सहाय्यक पंच हिमांशू थापा, आशित चौरसिया, मुस्कान पटेल,गौसिया शेख, स्नेहा जैस्वाल, सोनाक्षी थापा, मयूर सूर्यथाले, दक्ष महाडिक, सरवारी गांगुर्डे, रिद्धी नाईक, तन्वी चव्हाण यांनी या स्पर्धेमध्ये मोलाचे कामगिरी केले या स्पर्धेचे उद्घाटन राखीव पोलीस निरीक्षक क्रीडा अधिकारी पोलीस प्रशिक्षण विद्यालय मरोळ मुंबई डॉक्टर. हानशी प्रदीप महादेव मोहिते आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर व गोल्ड मेडलीस नॅशनल व इंटरनॅशनल अवॉर्ड यांनी केली यांना या स्पर्धेमध्ये सन 2023 कराटे व विविध क्रीडा प्रकारा मध्ये सुवर्णपदके तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनी कामगिरी केल्याबद्दल शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच रेंनशी चंद्रकांत मर्चंडे ग्रँडमास्टर मुंबई पोलीस यांचाही उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला जवळपास या स्पर्धेमध्ये 300 च्या वर स्पर्धकांनी भाग घेतला स्पर्धेत मुंबई ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली पनवेल तसेच इतर महाराष्ट्रातील नामांकित संघ तसेच इतर राज्यातील गुजरात राजस्थान आसाम येथील प्रशिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला तसेच खाली विजेते संघ फर्स्ट प्राइज रायगड प्रशिक्षक कल्पेश शिंदे, सेकंड प्राईज राजस्थान वीरेंद्र सिंग, थर्ड प्राईज मुंबई अजय सरोदे ,राजू थापा गोरसिया तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन कमलेश कसबे तसेच राखीव पोलीस निरीक्षक डॉक्टर. प्रदीप मोहिते आंतरराष्ट्रीय ग्रँडमस्टर, पोलीस प्रशिक्षक चंद्रकांत मर्चंडे ग्रँडमास्टर यांनी सर्व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.