५ दिवसांसाठी विराजमान झालेल्या गणरायाचे ठिकठिकाणी विसर्जन
२०० हुन अधिक पोलिसांची पवई तलावाशेजारी बंदोबस्त
३ हजार हुन अधिक बाप्पाचे पवई तलावात विसर्जन
देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्व वातावरण मंगलमय झाले आहे. दीड दिवसांसाठी विराजमान झालेल्या श्री गणेशाच्या विसर्जनानंतर काल म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी ५ दिवसांसाठी विराजमान झालेल्या गणरायाचे ठिकठिकाणी विसर्जन झाले. मुंबईतील पवई तलाव येथे मोठ्या प्रमाणात श्री गणेशाच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. या वेळी २०० हुन अधिक पोलीस पथक या ठिकाणी सज्ज होत. साधारणतः ३ हजार श्रींचे विसर्जन करण्यात आले.
मुंबईतील पवई तलावात विसर्जनासाठी भाविकांची गर्दी
Related Posts
झोपडीधारकाची आत्महत्या! भाडे न मिळाल्याने विष पिऊन घेतला जीव
जोगेश्वरी पूर्वेला एका खासगी प्रकल्पातील झोपडीधारकाने भाडे न मिळाल्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत झोपडी धारक अहमद हुसेन शेख (४६) यांचा जोगेश्वरीतील महापालिकेच्या ट्रॉमा केअर…
अंधेरी पोलीसांचे उत्तम कामगिरि….मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश, चोरीच्या १२० मोबाईलसह तीन आरोपींना अटक
सलाहुद्दीन शेख दि. ०४/०१/२५ अंधेरी पोलीस ठाणेकडुन जबरीने मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडुन किं.अं ९,१८,३००/- रूपये किंमतीचे एकुण १२० मोबाईल हस्तगत करण्यात आले. फिर्यादी यांनी अंधेरी पोलीस ठाणे…