विकास शेलार

दिनांक २६,११,२०२३ रोजी शेवगाव पोलीस ठाणे येथे, महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेतर्फे ,मुंबई येथे आतंकवादी हल्यात शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहुन, शेवगाव पोलीस यांना गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद मानले.


या कार्यक्रमाला शेवगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ,विलास पुजारी यांनी परवानगी दिल्या बद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद करण्यात आला.शहिद झालेल्या सर्व वीर जवान यांना शेवगाव पोलीस ठाणे चे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांच्या हस्ते हार घालून श्रध्दांजली वाहण्यात आली

.व प्रत्येक पोलीस अधिकारी यांना गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद मानले, कार्यक्रमाला उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे, पोलीस सब इन्स्पेक्टर अमोल पवार, व सर्व पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार कर्मचारी ,महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष दिपक मोहिते, महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकास शेलार

व महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना शेवगाव तालुका सचिव मधुकर मोहिते, महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे नवनिर्माण पदाधिकारी राक्षी शाखा प्रमुख दिलीप जगधने,या वेळी उपस्थित होते,

शेवगाव पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना राक्षी शाखा प्रमुख ,दिलीप श्रीधर जगधने यांना नियुक्ती देण्यात आली व संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.