संतोष चौगुले

अमोलजी खैरे म्हणजे खरा अवलिया जो खेड्यातून मुंबईत आपलं अस्तित्व ठळकपणे कलाक्षेत्रात उमटवणारा एक मनस्वी रंगकर्मी, पूर्वीपासून काहीतरी करण्याची धमक बाळगणारा एक धडपड्या माणूस. नाटक, सिनेमा, साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणारा खरा कलावंत. याची मोठी खूबी म्हणजे फक्त स्वत: पुढे न जाता

सोबतच्या अनेक जणांना एकत्रित करुन एक समुह बांधून सर्वांनाच पुढे नेण्याचा प्रयत्न करणारा निस्वार्थी माणूस आणि सच्चा कलावंत. हा कलाकार केवळ कलाक्षेत्रातच नाही तर समाज कार्यातही पुढाकार घेऊन समाजसेवेचे व्रत घेणारा व समाजाप्रती आपुलकी जपणारा रंगकर्मी. त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपली महानगरपालिकेतील सेवाही चोखपणे बजावणारा एक उत्कृष्ठ कर्मचारी. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या मनपुर्वक शूभेच्छा. कलाक्षेत्रात त्यांनी उत्तोरोत्तर उंची गाठावी ही मनोकामना.अशा या अवलिया कलाकाराचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयात साजरा करण्याचा योग आला ही आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट.शुभेच्छुक संतोष चौगुले आणि मत्र परिवार