

प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाणे : माहे जुलै २०१६ ते फेब्रुवारी २०१७ चे दरम्यान रायगड गल्ली, पाचपाखाडी, ठाणे येथे आरोपी आकाश मारूती हटकर (वय: २८ वर्षे) याने अल्पवयीन मुलगी हिला जिवे ठार मारण्याची धमकी देवुन तीच्या सोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास कुंटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास आरोपी व त्याची आई रेखा मारूती हटकर (वय: ४८ वर्षे) हे उल्हासनगर येथे डॉक्टरकडे घेवुन जावून फिर्यादीस जबरदस्तीने गर्भपात कर नाहीतर तुझी बदनामी करू अशी धमकी देवून गर्भपात करण्यास भाग पाडले.
सदर घडलेल्या प्रकाराबाबत अल्पवयीन मुलीने नौपाडा, पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १५५/२०१७, भारतीय दंड संहिता कायदा कलम ३७६ (एफ) (एच)(१) (एन) ५०६ (२), सह पोस्को ३,४,५,६ नुसार आरोपी १. आकाश मारूती हटकर (वय: २८ वर्षे) २. रेखा मारूती हटकर (वय: ४७ वर्षे) यांचे विरूध्द फिर्याद दिली होती व त्या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती.
सदर गुन्ह्याच्या तपासात तत्कालीन तपासी अधिकारी श्री. प्रकाश पाटील, पोलीस निरीक्षक व त्यांचे तपास पथकाने भक्कम पुरावे गोळा करून आरोपी विरूध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सदर गुन्ह्याची सुनावणी मा. श्री. देशमुख साहेब, जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे यांनी घेवुन बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी आकाश मारूती हटकर यास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २३५ (२) अन्वये दोषी ठरवून त्यास भारतीय दंड संहिता ३७६ प्रमाणे १० वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपी क्रमांक २. रेखा मारूती हटकर हीस फौजदारी प्रक्रिया संहिता २३५(१) अन्वये या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
सदर बलात्काराच्या गुन्ह्याच्या संदर्भात सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्त्या श्रीमती रेखा हिवराळे मॅडम, म्हात्रे मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद कुंभार, तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश पाटील, पोलीस उप-निरीक्षक प्रशांत लोंढे, मुद्देमाल कारकुन सपोउपनि. बोराडे, कोर्ट पैरवी पोहवा. राठोड, लोहार, समन्स व वॉरंन्ट अंमलदार पोहवा. म्हामुनकर, वीर, पोशि. सिंग, यांनी अथक परिश्रम करून मा. न्यायालयात ठोस पुरावे सादर केले व त्यामुळे उपरोक्त गुन्ह्यातील आरोपीला दोषी ठरविण्यात यश आल्यामुळे सदर उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस दलात व समाजातील सर्व स्तरातुन पोलीसांचे कौतुक होत आहे.