प्रतिनिधी – अवधुत सावंत

कल्याण – परिमंडल-३ कल्याण अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागातील खडकपाडा पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, महात्मा फुले पोलीस ठाणे व कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकांच्या वापरातील मोबाईल चोरी तसेंच गहाळ झाले होते. सदर चोरी व गहाळ झालेबाबतच्या तक्रारीनुसार मोबाईल फोनचा शोध घेणेबाबत वरिष्ठांच्या सुचना प्राप्त झाल्या होत्या. त्याप्रमाणे अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, पोलीस उप-आयुक्त, परिमंडल-३, कल्याण अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मागदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, महात्मा फुले पोलीस ठाणे व कोळसेवाडी पोलीस ठाणे मध्ये तांत्रिक ज्ञान असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नियुक्त करण्यात आली होती. सदर पथकांनी सीईआयआर या पोर्टलचा वापर करून तांत्रिक विश्लेषन करून खालीलप्रमाणे किंमतीचे चोरी व गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.

खडकपाडा, महात्मा फुले, बाजारपेठ, कोळसेवाडी पोलीस ठाणे येथील मोबाईल फोन चोरी व गहाळ झालेले असे ७२ मोबाईल फोन ज्याची एकुण ११,१८,७८०/- रू. किंमतीचे संबधीत तक्रारदार यांना ओळख पटवुन दिनांक ०२/०७/२०२५ रोजी पोलीस उप-आयुक्त, परिमंडल-३ चे अतुल झेंडे, व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाचे कल्याणजी घेटे यांच्या हस्ते मुळ मालकांना हस्तांतरित करण्यात आले.