

प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली : गणेशोत्सव व गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राखण्यासाठी विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या वतीने आज दुपारी भव्य रूट मार्च काढण्यात आला.
सायंकाळी ५.०० ते ६.३० या वेळेत झालेल्या या रूट मार्चमध्ये कोपर ब्रिज चौकी – जोंधळे चौक – दीनदयाळ चौक – दीनदयाळ रोड – सम्राट चौक – नाना शंकर शेठ पथ – गोपी चौक – गुप्ते रोड – मच्छी मार्केट – स्टेशन रोड – कोपर ब्रिज चौकी असा विस्तृत मार्ग समाविष्ट होता. या रूट मार्चसाठी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तसेच बाहेरील बंदोबस्ताचे मिळून १० अधिकारी, ३४ पुरुष अंमलदार, १५ महिला अंमलदार व १६ होमगार्ड सहभागी झाले होते.
या रूट मार्चचे नेतृत्व विष्णुनगर पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी केले तर संपूर्ण रूट मार्चदरम्यान पोलीस निरीक्षक (गुन्हे) गहिनीनाथ गमे यांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सव काळात शहरातील शांतता, सुसंवाद आणि सुरक्षिततेचे वातावरण टिकवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.