दांडिया खेळताना अनेकदा भान विसरून नाचल्याने अनेकदा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच कोरोनानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे देखील अनेक अहवालातून समोर आले आहे, बदलत्या जीवनशैलीमुळे विविध विकारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय सहाय्याची तातडीची परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे, ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी उपलब्ध करून द्यावी ,असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.