सलाहुद्दीन शेख
छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय (डोमेस्टिक) विमानतळ येथील बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड
कंपनीतील हाऊस कीपिंग विभागातर्फे माघी गणेश उत्सवानिमित्त श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती या महापूजेला
भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस,संजय कदम आणि चिटणीस सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, पोपट बेदरकर,
योगेश आवळे ,सहचिटणीस विजय शिर्के, संजू राऊत, विनायक शिर्के तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
यावेळी कमिटी अध्यक्ष सचिन नाईकवडे आणि इतर कमिटी सदस्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.