प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.२२: कल्याणमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये क्षुल्लक कारणावरून एका मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा च्या मुसक्या अखेर कल्याण पोलीसांकडून आवळण्यात आल्या आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी या माजोरड्या गोकुळ झाला पकडून दिले. मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण परिसरात सर्वत्र शोध घेतला आणि अखेर त्याला पकडलं. यावेळी मनसे सैनिकांनी गोकुळला बेदम चोप देत पकडून पोलीसांच्या स्वाधीन केलं आहे. कल्याण पोलीसांनी आरोपी गोकुळला बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला मारहाण झाल्याची घटना घडली होती. गोकुळ झा असं या माजोरड्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारपासून हा आरोपी गोकुळ झा फरार होता. अखेरीस मनसे सैनिकांना त्याच्या ठिकाणाचा पत्ता लागला. मनसेसैनिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर कल्याण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आता या गोकुळला कल्याणच्या कोर्टात बुधवारी सकाळी हजर केले जाणार आहे.