संदिप कसालकर

मेघवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अलर्ट सिटिझन फोरम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कै. प्रविण दवंडे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर रविवार, ३ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मेघवाडीचा राजा (मुख्य मंडप, शनिमंदिर शेजारी, जोगेश्वरी पूर्व) येथे होणार आहे.

शिबिरात पुढील तपासण्या विनामूल्य करण्यात येणार आहेत:
✅ मधुमेह, ब्लड प्रेशर आणि इतर तपासणी
✅ ECG
✅ दृष्टी व डोळे तपासणी
✅ त्वचारोग व छाती (PFT) तपासणी
✅ ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपी आणि दंत तपासणी

याशिवाय, शिबिरादरम्यान आढळलेल्या गरजू रुग्णांना मोफत मोतीबिंदू ऑपरेशन मार्गदर्शन दिले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
🔹 अनिल मोरे: ८६२५९१६३८१
🔹 निरंजन आहेर: ९८३३०१०२१७
🔹 अशोक सावंत: ९८२१००७८९३
🔹 संतोष शेट्ये: ९८२०२३७२७७

रुग्णांसाठी ही उत्तम संधी असून, नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.