सलाहुद्दीन शेख

खडकपाडा पोलीस ठाणे, ठाणे शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने ४० बेवारस वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध

खडकपाडा पोलीस ठाणे येथे अभिलेखावरील नोंद नसलेल्या बेवारस वाहने पोलीस ठाणेच्या आवारात बऱ्याच वर्षापासून धुळखात पडून आहेत. ४० बेवारस वाहन मालकांचा शोध लागला असून ती वाहने उन, वारा, पाऊसामुळे त्यांना गंज लागून वाहनांची झीज झाली आहे. बऱ्याच वाहनावरील रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर गंजलेले आहेत. त्यामुळे शोध घेताना बरीच अडचण येत आहे. तसेच सदर ठिकाणी दुर्गधी पसरल्याने पोलीसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे खडकपाडा पोलीस ठाणे येथे दाखवून सात दिवसांच्या आत घेवून जावे अन्यथा पोलीसांकडून त्या वाहनांची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यात येईल असे आवाहन खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी केलेले आहे.

पोलीस ठाणेस शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रकीयेमुळे व बेवारस वाहनांचे मुळमालक मिळून येत नसल्याने, ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडून आहेत. या पार्श्वभुमीवर ठाणे शहरचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग संजय जाधव,परिमंडळ ३ कल्याणचे पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, कल्याण विभागाचे सहा. पोलीस आयुक्त/कल्याणजी घेटे, यांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेवून ती वाहने मुळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश खडकपाडा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, खडकपाडा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले, पोहवा / २२ गोलवड, मपोहवा /६७७१ पवार, मपोहवा / ८१४४ गायकवाड यांचे पथक नेमून त्यांना आदेश दिले. त्यासाठी नमुद पथकाने परंदवाडी, तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत व उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांची माहिती काढून त्यांची मदत घेतली. राम उदावंत यांनी खडकपाडा पोलीस ठाणे येथे येवून सर्व वाहनांची पाहणी केली. वर नमूद अंमलदारांच्या मदतीने सर्व वाहनांचे चेसीस नंबर, इंजिन नंबर क्रमांकावरून वाहनांचा मुळ मालकांचा शोध घेणकरीता प्रादेशिक परिवहन विभाग, ठाणे, कल्याण, येथे पत्रव्यवहार करून मुळ मालकांचा शोध लावला. तसेच गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहन मालकांना दोन वेळा पत्र पाठविण्यात आले आहे. तरी सदरच्या वाहन मालकांनी पत्र मिळताच आपले वाहन पोलीस ठाण्यात येऊन तपासुन खात्री करावी व वाहनाची कागदपत्रे दाखवुन योग्य ती कायदेशीर प्रकिया पुर्ण करून आठ दिवसांत खडकपाडा पोलीस ठाणे येथुन घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

तरी सदरची वाहने घेवून न गेल्यास कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव करण्यात येईल व त्यातून मिळालेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे वरीष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितलेले आहे.