संदिप कसालकर
मुंबई : सायबर गुन्हे आणि बालकांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज दि. 06 फेब्रुवारी 2025 रोजी मेघवाडी पोलिसांच्या वतीने श्रमिक विद्यालयात सायबर अवेअरनेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात सपोआ मेघवाडी संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव आणि म. पो. उ. नि. अश्विनी भरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या बाबी समजावून सांगण्यात आल्या.
विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना:
🔹 सायबर क्राईम अवेअरनेस आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे महत्त्व समजावले.
🔹 1930 हेल्पलाइन नंबर व cybercrime.gov.in वेबसाइट प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सेव्ह करण्याचे आवाहन.
🔹 Good Touch – Bad Touch संकल्पना स्पष्ट करून पोक्सो कायद्याविषयी माहिती दिली.
🔹 अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि कोणतीही संशयास्पद घटना त्वरित शिक्षक किंवा पालकांना सांगावी.
🔹 बालकांविरुद्ध घडणारे गुन्हे, लैंगिक शोषण व छेडछाड रोखण्यासाठी कायद्यातील तरतुदी स्पष्ट केल्या.
🔹 सोशल मीडियाचा सुरक्षित वापर करण्याचे मार्गदर्शन.
🔹 लेबर क्राईम व सायबर क्राईमशी संबंधित हेल्पलाइन क्रमांक 100/103/1098/1930 यांचा वापर करण्याचे आवाहन.
या कार्यक्रमात श्रमिक विद्यालयातील 5 वी ते 9 वीच्या सुमारे 200 ते 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यालयातील शिक्षकांसह सपोआ मेघवाडी संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पो. नि. साबळे, निर्भया पथकाच्या मपोशि देसाई, जगताप, पो. ह. पवार, मिल्स स्पेशल माने आणि पो. शि. कांबळे उपस्थित होते.
मेघवाडी पोलिसांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता वाढणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.