संदिप कसालकर
दिवाळीसणा निमित्त जोगेश्वरी पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या आयुष्यात आपुलकीचा प्रकाश दरवळत राहो या कल्पनेतून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
उपस्थित जेष्ठ नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित जेष्ठ नागरिक व जोगेश्वरी पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांनी संगीत गायन करून उपस्थित्यांचे मनोरंजन केले.
सदर कार्यक्रमास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 10, मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त, मेघवाडी विभाग, मुंबई तसेच जोगेश्वरी पोलीस ठाणेतील सर्व अधिकारी व अंमलदार तसेच 120 जेष्ठ नागिरक हे उपस्थित होते.