सलाहुद्दीन शेख

शिळ डायघर पोलीस ठाणे, ठाणे शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने लावला ७७ गाडयांच्या मुळ मालकाचा शोध

शिळ डायघर पोलीस ठाणेत बेवारस मालमत्तेतील एकुण ७७ वाहने पोलीस ठाणेच्या अवारात बऱ्याच कालावधीपासुन जमा आहेत त्यापैकी ७० दुचाकी व ०६ चार चाकी व ०१ अॅटो रिक्षा अशी एकुण ७७ वाहने बेवारस अवस्थेत अनेक वर्षापासुन धुळखात पडुन आहेत त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनाची कागदपत्रे दाखवुन सात दिवसाच्या आत घेवुन जावेत अन्यथा पोलीसांकडुन त्या वाहनाची कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करण्यात येईल असे आवाहन शिळ डायघर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी केले आहे.

पोलीस ठाणेस शेकडो वाहने विविध गुन्हयात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रक्रीयेमुळे व बेवारस वाहनाचे मालक मिळुन येत नसल्याने ही वाहने पोलीस ठाणेच्या आवारात अनेक वर्ष मालकाच्या प्रतीक्षेत

धुळखात पडुन आहेत या पार्श्वभुमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेब यांनी बेवारस वाहनांच्या

मालकाचा शोध घेवुन ती वाहने त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार पोलीस सह आयुक्त चव्हाण,अपर पोलीस आयुक्त देशमुख, परिमंडळ १ पोलीस उप आयुक्त बुरसे,कळवा विभागाचे सहा पोलीस आयुक्त  कोळेकर व शिळ डायघर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार पोलीसांनी बेवारस वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली

त्यासाठी पोलीसांनी परंदवाडी तळेगाव दाभाडे, ता मावळ, जि पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी शिळ डायघर पोलीस ठाण्यात येत बेवारस अवस्थेत असलेल्या वाहनाची पाहणी केली उदावंत व पोलीसांनी बेवारस वाहनांचे चेसीस नं व इंजिन क्रमाकांवरून दोनच दिवसात ७७ वाहनाच्या मुळ मालकाचा शोध लावला. त्यासाठी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल वरुडे, पो. हवा/भरत जाधव, पो.हवा/विकांत कांबळे, पो.ना/राजेंद्र दणाणे (मुद्देमाल कारकुन), पो.ना./ गणेश देशमुख यांच्यासह गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भारत वाघ, यांनी परिश्रम घेतले.

तसेच ज्या मालकाची वाहने असतील त्यांनी पोलीस ठाणेस येवुन आपले वाहन तपासुन घेवुन जावे. तसेच सदरचे वाहन घेवुन न गेल्यास कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातुन आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी सांगीतले आहे.

टिप : असा लावला जातो शोध :-

सुरवातीला वाहनाचे चेसीस व इंजीन नंबर यांची यादी केली जाते. त्यानंतर वाहनाची विभागणी करून बेवारस, अपघात व गुन्हयातील वाहने अशी वर्गवारी करून मुळ मालकाचा घराचा पत्ता शोधला जातो. अनेकदा वाहन मालकाचा जुना पत्ता रजिस्टर नोंद असल्याने मालक त्या पत्यावर मिळुन येत नाही. वाहनाची बारकाईने माहिती गोळा करून मुळ मालकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातो. असे संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी सांगितले.