सालहुद्दीन शेख

जळगावमध्ये ३ लाखांच्या लाच प्रकरणात परिवहन अधिकारी व खाजगी इसम अटकेत

जळगाव: छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी यशस्वी सापळा रचत जळगाव येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक अण्णा पाटील (वय ५६) व त्यांचा सहकारी भिकन मुकुंद भावे (वय ५२) या खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

घटना कशी घडली?
तक्रारदार, वय ५५, हे जळगाव जिल्ह्यातील असून त्यांची सीमा तपासणी नाका, नवापूर येथे नोव्हेंबर २०२४ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी ₹३,००,०००/- (तीन लाख रुपये) लाचेची मागणी केली होती. लाचेची स्वीकृती फ्लॅट नं. ३, १० लेक होम अपार्टमेंट, मेहरून तलावजवळ घेण्यात आली.

सापळ्याची यशस्वी कारवाई
छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत पाटील व त्यांचा खाजगी सहकारी भावे यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

गुन्हा दाखल व पुढील कार्यवाही
दोघांविरोधात पोलीस ठाणे एमआयडीसी, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील चौकशी सुरू आहे.

नागरिकांना आवाहन
लाच मागणी किंवा भ्रष्टाचाराचा सामना झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.
पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर – ९९२३०२३३६१
पोलीस उपअधीक्षक, सुरेश नाईकनवरे – ९९२३२४७९८६

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरोधात जनतेत विश्वास निर्माण झाला आहे.