पोलीस व एन.आय.ए.चा अधिकारी असल्याची बतावणी करणारा इसमास शिताफिने पकडुन त्याचेवर गुन्हा नोंद करून त्यास अटक केलेबाबत…..
सलाहुद्दीन शेख.
अटक आरोपी :- राकेश चंद्रशेखर पुजारी, वय ४३ वर्षे,
आगामी विधानसभा निवडणूक २०२४ शांतेतेत व सुरळीत पार पाडण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हददीत काही गैरकृत्य होवू नये तसेच निवडणूक प्रकीयेत बाधा येवू नये याकरीता ,पोलीस आयुक्त साो, बृहन्मुंबई, सह पोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, बृहन्मुंबई, अपर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई, पोलीस उपआयुक्त माो, परीमंडळ ०९, बृहन्मुंबई यांनी वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केलेले असल्याने दिनांक १५/११/२०२४ रोजी दा. नौ. नगर पोलीस ठाणेतील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उ.नि. अविनाश दराडे, स.फौ. बोटे, म.पो.ह.क/७४७ स्मिता पेडणेकर, पो. शि.क./०९१५७८ वरे, पो.शि.क. ०९०१५५/बाबर, पो. शि./पोळ असे पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळी २०:०० वा. च्या सुमारास गावदेवी डोंगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथील झोपडपट्टी भागात उस्मानिया डेअरीच्या समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे गस्त करीत असताना कर्तारसिंग हॉस्पीटलच्या दिशेने एक इसम त्याच्याकडील बुलेट मोटर सायकल क्रमांक एम.एच. ०२ ई.जे. ७६७७ यावर येत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकास दिसला सदर मोटर सायकलच्या समोरील भागावर सत्यमेव जयते व पोलीसचे चिन्ह असलेले दिसून आले म्हणून पोलीस पथकाने त्यास थांबवून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने तो पोलीस विभागाचा पोलीस निरीक्षक दर्ज्याचा अधिकारी असल्याचे व तो सध्या डेप्युटेशन वर सेट्रल गव्हरमेन्ट, NIA मध्ये अधिकारी असल्याचे त्याने पोलीस पथकाम सांगितले. त्यावेळी त्याच्यावर पोलीस पथकास संशय आल्याने पो.उ.नि. अविनाश दराडे यांनी त्यास त्याचे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले असता त्याने त्याचे नांव राकेश चद्रशेखर पुजारी असे असल्याचे सांगून त्याचेकडील ओळखपत्र दाखविले ते पाहीले असता त्यावर GOVERNMENT OF INDIA, MINISTRY OF HOME AFFAIRS UNDERTAKING NATIONAL INVESTIGATION AGENCY, ID CARD NO B7197NAME – RAKESH CHANDRASHEKHAR POOJARI, RANK-INVESTIGATION OFFICER ( DEPUTATION), DATE OF ISSUE-02-07-2007, DATE OF BIRTH-07-04-1980 असे नमुद असलेले (N K Tyagi) Superintendent of Police (Adm) NIA असे नमूद केलेले दिसून आले.
त्यावेळी सदरचे ओळखपत्राबाबत पोलीस पथकास शंका आल्याने त्यास आणखी विचारपूस करता तो गोंधळला व असमाधानकारक उत्तरे देवू लागल्याने त्याच्याकडे असणा-या त्याचा डार्क ग्रिन रंगाचा सॅमसंग कंपनीचा एस २२ प्लस मोबाईल हॅण्डसेट पाहीला असता त्यावर त्याने स्वतः मुंबई पोलीस तीन स्ट्रार असलेला अधिकारी ड्रेस व कॅप परिधान केल्याचा फोटो डिस्पेलवर ठेवला असल्याचे दिसून आले. दरम्यान त्याच्याकडील मोबाईल ताब्यात घेवून मोबाईलमधील गॅलरीतील फोटो पाहीले असता त्याचे मोबाईलच्या गॅलरीमध्ये राकेश सी पुजारी, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर या नावाने नेमप्लेटसह स्वतः पोलीस अधिका-याचा ड्रेसवर व्हीडीओ व फोटोग्राप्स काढले असल्याचे दिसून आले.
तसेच त्याच्या मोबाईलमधील गॅलरीमध्ये पोलीस अधिका-याचे गणवेश व ओळख चिन्ह असलेले पिस्टल, बेडी यांचे फोटो देखील दिसून आले म्हणून त्याच्यावर पोलीस पथकाचा सशंय बळावल्याने पो.उ.नि. दराडे यांनी त्याच्याकडे आणखी विचारपूस केली असता त्याने सोबत बाळगलेले ओळखपत्र तसेच पोलीस निरीक्षक अधिकारी दर्ज्याची वर्दी तसेच वेगवेगळी ओळखचिन्हे ही बनावट असून ती त्याने पोलीस अधिकारी असल्याचे भासविण्याकरीता ती खरी म्हणून वेगवेगळया ठिकाणी वापरली असल्याचे पोलीस पथकास सांगितले. त्यावेळी त्यास त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव, पत्ता राकेश चंद्रशेखर पुजारी, वय ४३ वर्षे, धंदा- नाही, रा.ठी. जी २, भिमा चाळ, प्रेम नगर जनता कॉलनी, जनशक्ती पोलीस चौकी जवळ, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई ६० असे असल्याचे सांगितले.
सदर इसम नामे राकेश चंद्रशेखर पुजारी याने त्याच्या कब्जात लोकसेवक वापरतो तश्या प्रकारचे बनावट ओळखपत्र वापरुन ते बनावट असल्याचे माहीत असताना ते जाणीवपुर्वक खरे असल्याचे भासवुन पोलीस पथकाची व जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला म्हणून गु.र.क्र. १२२३/२०२४, कलम २०५,३१८ (४), ३३६ (२) (३), ३४० (२) भारतीय न्याय संहिता (बी. एन.एस.) २०२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर आरोपी यास अटक करण्यात आलेली असुन त्याचे घरातुन एक पिस्टल, नॅशनल इन्व्हीस्टीगेशन एजन्सी (एनआयए) ची दोन ओळखपत्र, पोलीस निरीक्षक अधिकारी यांचा गणवेश, पोलीस निरीक्षक अधिकारी यांची टोपी, असा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी याने सदरचा पोलीस अधिकारी गणवेश तसेच एनआयए चे ओळखपत्र वापरून गैरकृत्य केले असण्याची शक्यता असल्याने आरोपीत यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सारे, अंधेरी पुर्व मुंबई यांचे न्यायालयात हजर ठेवून पोलीस कोठडी घेवून अधिकचा तपास कल्याण कर्पे, सहा. पोलीस आयुक्त साो, दा. नौ. नगर विभाग, मुंबई, शहाजी पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, दा. नौ. नगर पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे करीत आहेत.
सदरची कार्यवाही, पोलीस आयुक्त सारे, मुंबई, अपर पोलीस आयुक्त साो, पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई, पोलीस उपआयुक्त साो, परीमंडळ ०९, मुंबई, सहायक पोलीस आयुक्त सो, दा. नौ. नगर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, शहाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, सहा. पो. उपनि बोटे, महीला पो. हवा. ७४७/स्मिता पेडणेकर, पो. हवा. ३१६२२१/ चव्हाण, पोशिक ०९०१५५ ऋषिकेश बाबर, पोशिक ०९१५७८/प्रसाद वरे, पोशिक ०८०४९५ रेवननाथ घुगे, पोशिक १३०७३३/सुमित पोळ यांनी केलेली आहे.