सलाहुद्दीन शेख

अविस्मरणीय उत्साह, आणि अदभुत टीम स्पिरिट…
वरळी, पवई, ठाणे अंधेरी, जोगेश्वरी येथून तब्बल १८ महिलांचे सहभाग घेत..

जोगेश्वरीच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित जागतिक महिलादिन विशेष “राजमाता जिजाऊ चषक महिला क्रिकेट स्पर्धा” अभुतपूर्ण जल्लोषात यशस्वी संपन्न

मेघवाडी व जोगेश्वरी पोलिस ठाणे, अलर्ट सिटीजन फोरम सामाजिक संस्था आणि मेघवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संयुक्त आयोजित..

महिलादिनाचे औचित्य साधत, महिलांचे मैदानी कलागुणांना वाव देत या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्या मध्ये विविध भागातून १८ संघांनी सहभाग घेतला. अत्यंत नियोजन बद्ध कार्यक्रमाचे उद्घाटन ▫️सहाय्यक आयुक्त – मुंबई पोलीस श्री. संपतराव पाटील सर, ▫️महाराष्ट्र नशामुक्ती महामंडळाच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी वर्षा विद्या विलास ताई, ▫️जोगेश्वरी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजश्री गजभिये मॅडम, ▫️शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय खेळाडू कोमल देवकर तसेच ▫️केईएम हॉस्पिटल च्या अधिकारी दीपा मुणगेकर मॅडम यांची विशेष

उपस्थिती होती. या व्यतिरिक्त दिवसभरात विविध नामवंत मान्यवरांनी या कार्यक्रमास भेट देत आपल्या शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे या आयोजनात.. मुंबई पोलीस जोगेश्वरी व मेघवाडी पोलिस ठाणे महिला अधिकारी कर्मचारी टीम यांनी ही सहभाग घेतला होता. व आनंद लुटला.

रोजच्या धावपळीच्या जीवनातून विसावा घेत दिवसभर महिलांनी देखील आत्मविश्वासाने या स्पर्धेत सहभाग घेत खूप उत्साहाने आनंद लुटला व खूप छान छान प्रतिक्रिया व अनुभव शेअर केले. विशेष म्हणजे फक्त खेळायला नाही तर हजारोच्या संख्येने महिला व तरुण वर्ग प्रेक्षक म्हणून देखिल दिवसभर यात सहभागी झाले होते. खेळाडूंना दिवसभर चहा नाश्ता, ते दुपारी उन्हात थंड ताक अशी सर्वच प्रकारची व्यवस्था नियोजन करन्यात आले होते.

स्पर्धा म्हणजे हार जित होणारच..
यंदाचा “राजमाता जिजाऊ चषकाचे विजेते ठरले “संघर्ष टीम, शामनगर तर उप विजेते ठरले जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वच सहभागी संघाना सन्मानचिन्ह देत गौरव पत्रक देण्यात आले व आनंदाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.