वार्ताहर: संदिप कसालकर
जोगेश्वरी, 17 जुलै 2024 – सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, “अलर्ट सिटीझन फोरम”, मुंबईत कार्यरत सामाजिक संस्थेने डेंग्यू आणि मलेरिया सारख्या डासांपासून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी म्हणून व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत मोफत डास नियंत्रण औषध फवारणी उपक्रम आणि रहिवाशांना प्रतिबंधात्मक उपायांबद्दल शिक्षित करणे अश्या उद्देशांचा समावेश आहे.
जोगेश्वरीत ज्या परिसरात डासांची उत्पत्ती जास्त आहे त्या ठिकाणी मोफत डास नियंत्रण औषध फवारणी केली जात आहे. या उपक्रमाचा उद्देश प्राणघातक रोग करणाऱ्या डासांची संख्या कमी करणे आणि रहिवाशांना तात्काळ दिलासा देणे हा आहे.
“उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे आणि यावर आमचा विश्वास आहे.” “प्रत्यक्ष कृती आणि शिक्षण या दोन्हींद्वारे डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका कमी करून जनतेसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.” असे अलर्ट सिटीझन फोरमचे अध्यक्ष निरंजन अहेर यांनी म्हटले आहे.
या उपक्रमाला स्थानिक समुदायाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, अनेक रहिवाशांनी त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
संस्थेचे स्वयंसेवक जोगेश्वरीतील सर्वांना विनंती करत आहेत की जर कोणाला या मोफत कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी अलर्ट सिटीझन फोरमशी संपर्क साधावा. आपल्या सभोवतालची स्वच्छता राखण्याचे आणि डासांची पैदास करू शकणारे साचलेले पाणी काढून टाकण्याचे आवाहन अलर्ट सिटीझन फोरम द्वारे करण्यात आले आहे.
या संस्थेचा हा सक्रिय दृष्टिकोन सार्वजनिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका कशी बजावू शकतात याचे एक प्रशंसनीय उदाहरण आहे.
मोहिमेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा सहभागी होण्यासाठी, रहिवासी अलर्ट सिटीझन फोरमशी +91 98336 38989 वर संपर्क साधू शकतात.