सलाहुद्दीन शेख

सिम कार्ड घेता! बायोमॅट्रिक करतांना सावधान,,

ऑनलाईन लोन देण्याचे अमिष दाखवून इन्शुरन्स साठी  ४५,०००/- रु ऑनलाईन फसवणूक केल्याचा गुन्हा पार्कसाईड पो ठाणे येथे दाखल केला होता.

तपासात गुन्ह्यात वापरलेल्या मो. क्रमांकावरून एका इसमास ताब्यात घेतले त्याने पनवेल स्टेशन समोरील विक्रेत्याकडे सीम पोर्ट केल्याचे सांगितले.

सिम विक्रेता सिमकार्ड घेणाऱ्याला न सांगता त्यांची ३ ते ४ वेळा बायोमॅट्रिक करून त्याचे कागदपत्रांवर ३ ते ४ सिम कार्ड ऍक्टिवेट करुन ते बाहेर राज्यात विकत होता, त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडून दुसऱ्यांच्या नावे ऍक्टिव केलेले  २३७ सिम कार्ड, 5 मोबाईल, बायोमेट्रिक मशीन जप्त केली.