

प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली : दिनांक १३/०८/२०२५ रोजी ‘महामुंबई मंथन’ या वृत्तपत्राच्या पानावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करून अनुसूचित जाती समाजातील लोकांचा अवमान करणारी बातमी सुपारी घेऊन छापून आणल्यामुळे “महामुंबई मंथन” चे संपादक व संस्थापक अध्यक्ष (सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन) चे विशाल वी. शेटे यांनी या प्रकरणाला कटकारस्थान रचून आर्थिक देवाण-घेवाण करून शहरात जातीय दंगल घडवून आणू पाहणाऱ्या ‘अविष्कार बार रेस्टॉरंट’ तसेच ‘गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस’ चे मालक अभय गोरे, मुलगा अभिजीत अभय गोरे, सौ. आशा अभय गोरे या सर्व जातीवाद्यांवरती ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कलम ३(१) (आर) (एस) (टी) (यु) व्ही प्रमाणे तसेच बी.एन.एस कायदा कलम २९९, ३५२, ३५६, ६१, ७ प्रमाणे तसेच इतर संबंधित कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याबाबत यावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्षणराव अंभोरे यांनी अशी मागणी डोंबिवली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुहास हेमाडे यांच्याकडे केली आहे.

दिनांक १३/०८/२०२५ रोजी ‘महामुंबई मंथन’ या वृत्तपत्राच्या पानावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करून अनुसूचित जाती जमातीतील लोकांचा अवमान करणारी बातमी वृत्तपत्रावर छापून प्रसिद्ध करण्यात आली त्या संबंधात ह्या अगोदर संविधान चौकात बाजूलाच असणाऱ्या ‘अविष्कार बार रेस्टॉरंट’ व ‘गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस’ असणाऱ्या रेसिडेन्शिअल बिल्डिंगमध्ये अनाधिकृत अतिक्रम केलेला ‘अविष्कार बार रेस्टॉरंट’ तसेच रेसिडेन्शिअल बिल्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय चालवणारे ‘गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस’ तसेच त्या बिल्डिंगमध्ये अनाधिकृतपणे काम चालू असल्याच्या तक्रारी महानगरपालिका व पोलीस स्टेशनला याआधी देण्यात आलेल्या असून याचाच मनात राग धरून पैशाच्या जोरावर काही जातीयवादी पत्रकार/संपादक हाताशी धरून आर्थिक देवाणघेवाण करून एकत्रित येऊन कटकारस्थान रचून जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जातीयवादी रेस्टॉरंट बारचे मालक लॉजिंग चालक-मालक अभय गोरे, मुलगा अभिजीत अभय गोरे, सौं. अशा अभय गोरे, ‘महामुंबई मंथन’ वृत्तपत्राचे संपादक व विशाल वि. शेटे (संस्थापक अध्यक्ष सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन) या सर्वांवरती ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे तसेच इतरही संबंधित कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी असे पत्र दिनांक २१/०८/२०२५ रोजी देण्यात येणाऱ्या ह्या तक्रारी अर्ज संदर्भात संबंधितांवरती चौकशी होऊन ३०/०८/२०२५ पर्यंत गुन्हा दाखल करण्यात यावा असे मागणीत नमूद करण्यात आलेले होते. फौजदारी गुन्हे दाखल न करण्यात आल्यास कुठलीही सूचना न देता दिनांक १०/०९/२०२५ पर्यंत गुन्हे दाखल नाही केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाणे कार्यालयावर पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये शहरातील सर्व बहुजन पक्ष सामील होणार असल्याची नोंद व माहिती लक्षणराव अंभोरे यांनी प्रसिद्धी पत्रकातुन दिली आहे.