प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तलयाचे कार्यक्षेत्रात बेकायदा अग्नीशस्त्र बाळगणे खरेदी-विक्री करणाऱ्या तसेच समाजात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त ठाणे यांनी सुचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने मा. पोलीस सह आयुक्त, व मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर यांनी विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याकरिता आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने श्री. प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ५, ठाणे शहर श्री. मंदार जवळे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम चालू आहे. त्यानुसार कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. निवृत्ती कोल्हटकर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीत व अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे खरेदी-विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

दिनांक ०१/०९/२०२५ रोजी कासारवडवली पोलीस ठाणे तपास पथकाचे सपोनि. मनिष पोटे यांना नागलाबंदर सिग्नल जवळ, घोडबंदर रोड, ठाणे याठिकाणी एक इसम बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र विक्री करण्याकरीता येणार असल्याचे खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. निवृत्ती कोल्हटकर यांना कळविल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नागलाबंदर सिग्नल जवळ, घोडबंदर रोड, ठाणे या ठिकाणी सापळा लावुन दिनांक ०१/०९/२०२५ रोजी २२:५५ दरम्यान इसम नामे जोगिन्दर लछीराम राजभर (वय: २७ वर्षे), धंदा: प्लंबर, राहणार: कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम मुळ राहणार ग्राम तणवा, ता. जखनिया, जि. गाझीपुर, राज्य उत्तरप्रदेश यास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडे असलेल्या लाल रंगाची सॅक बॅगमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीन सह व ०२ जिवंत काडतुसे किंमत अंदाजे रु.६५,६००/- मिळुन आले. सदर अग्निशस्त्र व काडतुसे त्यांनी बेकायदेशीर बाळगल्याबाबत त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याने मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे कडील मनाई आदेशाचा भंग केला आहे, त्याच्या विरूध्द कासारवडवली पोलीस स्टेशन गु.र.नं ८१९/२०२५ भा.ह.का.क. ३, २५ सह म. पो. अधिनियम कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी श्री. प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, वागळे इस्टेट, ठाणे, श्री. मंदार जवळे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती कोल्हटकर, सपोनि. मनिष पोटे, पोउपनिरी. नितीन हांगे, सुनिल सुर्यवंशी, पो. अंमलदार. जगदीश पवार, जयसिंग रजपुत, गोरक्षनाथ काळे, संदीप तुपे यांनी केलेली असून पुढील तपास सपोनि. मनिष पोटे हे करीत आहेत.