
सलाहुद्दीन शेख
भोईवाडा पोलीस ठाणे, ठाणे शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने बेवारस ५५ वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध
भोईवाडा पोलीस ठाणे येथे बेवारस वाहने पोलीस ठाणे हद्दित कारिवली चौकीचे परिसरात बऱ्याच वर्षापासून ६१ धुळखात वाहने पडून आहेत त्यापैकी ५५ वाहन मालकांचा शोध लागला असून ती वाहने उन, वारा, पाऊसामुळे त्यांना गंज लागून वाहनांची झीज झाली आहे. बऱ्याच वाहनावरील रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर गंजलेले आहेत. त्यामुळे शोध घेताना बरीच अडचण येत आहे म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे भोईवाडा पोलीस ठाणे येथे दाखवून सात दिवसांच्या आत घेवून जावे अन्यथा पोलीसांकडून त्या वाहनांची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यात येईल असे आवाहन भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक,अशोक रत्नपारखी यांनी केले आहे.
पोलीस ठाणेस शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रकीयेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडून आहेत. या पार्श्वभुमीवर ठाणे शहरचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख, परिमंडळ २ भिवंडीचे पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे, भिवंडी पुर्व विभागाचे सहा. पोलीस आयुक्त/डॉ. विजय मराठे, यांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेवून ती वाहने मुळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, भोईवाडा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक (प्रशा/गुन्हे) प्रमोद कुंभार, पोहवा/दिलीप पाटील, पो.शि.क. ४२७६/सपकाळे, पो.शि. २२०७५/माने यांचे पथक नेमून त्यांना आदेश दिले. त्यासाठी नमुद पथकाने परंदवाडी, तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष श्री राम उदावंत व उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांची माहिती काढून त्यांची मदत घेतली. राम उदावंत यांनी भोईवाडा पोलीस ठाणे येथे येवून सर्व वाहनांची पाहणी केली. वर नमूद अंमलदारांच्या मदतीने सर्व वाहनांचे चेसीस नंबर, इंजिन नंबर क्रमांकावरून वाहनांचा मुळ मालकचा शोध घेणकरीता प्रादेशिक परीवहन विभाग, ठाणे/कल्याण/पिंपरी चिंचवड येथे पत्रव्यवहार करून मुळ मालकांचा शोध लावला. तसेच गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहन मालकांना पत्र पाठविण्यात आले आहे. तरी सदरच्या वाहन मालकांनी पत्र मिळताच आपले वाहन पोलीस ठाण्यात येऊन तपासुन खात्री करावी व जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहनाची कागदपत्रे दाखवुन योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून आठ दिवसांत भोईवाडा पोलीस ठाणे येथुन सदरची वाहने घेवून न गेल्यास कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे वरीष्ठ पोलीस निरिक्षक अशोक रत्नपारखी यांनी सांगितले आहे.