जीएसटी गुप्तचर विभागाने ५५ हजार कोटी कर थकबाकीबद्दल १२ कॅसिनो आणि १२ अाॅनलाइन रिअल-मनी गेमिंग कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये ड्रीम इलेव्हन, गेम्स प्ले, ट्ेंविटीफोर सेवन,हेड डिजिटल वर्क्स या कंपन्यांचाही समावेश अाहे.
गेमिंगच्या एकूण उत्पन्नावरील जीएसटी भरणा थकवल्याचा या कंपन्यांवर आरोप आहे. गेमिंग युनिकाॅर्न कंपनी ड्रीम इलेव्हनने २५ हजार कोटी रुपयांचा जीएसटी थकवल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली अाहे. अप्रत्यक्ष कर भरणा थकवल्याप्रकरणी बजावण्यात अालेली देशातील ही सर्वात मोठी कर नोटीस अाहे. या उद्योगांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते आगामी काळात गेमिंग कंपन्यांना १ लाख कोटी रुपयांपर्यंत नोटीस दिली जाऊ शकते.
ड्रीम इलेव्हन हायकोर्टात
नोटीस मिळाल्यानंतर ड्रीम इलेव्हन कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये बंगळुरूची ऑनलाइन गेमिंग कंपनी गेम्स क्राफ्ट टेक्नॉलॉजीला २१ हजार कोटींची कर नोटीस बजावण्यात आली होती.अप्रत्यक्ष कर प्रकरणाच्या इतिहासात एवढ्या प्रचंड रकमेची कर नोटीस पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.