 
									
अकोला : सांगवी मोहाडी येथे बैलजोडी चोरीला गेल्याच्या संशयातून वाद होऊन गावातील चार ते पाच जणांनी २ सप्टेंबर रोजी सकाळी एका ६० वर्षीय वृद्धास थापडाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीमुळे वृद्धाचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी चौघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सांगवी मोहाडी येथे एक बैलजोडी चोरीला गेली होती. त्या संशयातून देवेंद्र दरेकर (६०) यांना गावातील दिनकर वाघ, बाळा तेलगोटे, संतोष जंजाळ, जनार्दन त्र्यंबके सर्व रा. सांगवी मोहाडी यांनी देवेंद्र दरेकर यांना थापडाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांच्या मुलाने दवाखाना करून त्यांना घरी आणले होते. दरम्यान, रविवारी सकाळी ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातसुद्धा आरोपींनी छाती व पोटावर मारहाण केल्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अकोट फैल पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींनी अटक केली. पुढील तपास ठाणेदार चंद्रशेखर कडू करीत आहेत.
 
	 Maharashtra Police News
Maharashtra Police News 
	 
					 Avdhoot Sawant
Avdhoot Sawant 
					 
																			 
																			 
																			