सोलापूर : ‘सख्खे भाऊ पैक्के वैरी’ ही आपल्याकडे प्रचलित आहे. त्याची प्रचिती देणारी घटना सोलापुरातील फॉरेस्ट परिसरात मंगळवारी घडली. पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी झोपेत असलेल्या भावावर भावानंच सत्तूरनं वार केला. यात भावाचे डोकं फुटल्यानं त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अयाज अब्दुल सत्तार शेख (वय- ३६, रा. फॉरेस्ट, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.
यातील जखमी व त्याचा भाऊ हे शहरातील फॉरेस्ट परिसरात राहतात. सोमवारी रात्री जेवण आटोपून जखमी अयाज सत्तार शेख हा झोपलेला होता. अजाज आणि भाऊ ईज्जो यांचे काही कारणावरुन पूर्वी भांडण झालेले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी दारुच्या नशेत असलेल्या इज्जो यानं रागाच्या भरामध्ये अय्याज याच्या डोक्यावर सत्तूरने वार केला. यात त्याचे डोके फुटले. भळाभळा रक्त येऊ लागले. त्याच्या सर्वांगालाही दुखापत झालीू. सोमवारी मध्यरात्रीनंतर मंगळवारच्या १:१५ दरम्यान राहत्या घरी हा प्रकार घडला.
रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. डोक्यावर वार झाल्याने रक्त येत होते. तातडीने जखमीचा नानातेवाईक मुश्ताक शेख याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून, सिव्हील पोलिस चौकीत नातलगाच्या सांगण्यानुसार नोंद करण्यात आली आहे.
झोपेत असलेल्या भावावर नशेत सत्तूरनं केला वार; डोकं फुटलं
Related Posts
ठाणे पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती पोलीस पदक सन्मानाने गौरव..
प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे दि.२९ : ठाणे पोलीस आयुक्तालयात नेमणुकीत असलेल्या सहायक पोलीस आयुक्त. श्रीमती ममता लॉरेन्स डिसोजा, नेमणूक, विशेष शाखा, ठाणे शहर तसेच पोलीस उप निरीक्षक. महादेव गोविंद काळे,…
गुन्हे शाखा घटक-२ भिवंडी पोलीसांनी घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना शिताफीने केली अटक..
प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडी : गुन्हे शाखा घटक-२ चे पोलीस पथक हे परिमंडळ ०२ भिवंडी मध्ये गस्त घालीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शशिकांत यादव यांना बातमी मिळाली की, रेकॉर्ड…