संदिप कसालकर

देहविक्रीकरीता अल्पवयीन मुली पुरविणा-या टोळीतील ३ आरोपीतांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीतील काही सदस्य कुर्ला परिसरात अल्पवयीन मुलींना घेवून येणार असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा, कक्ष ५ ला मिळाली. या माहीतीच्या अनुषंगाने कक्ष ५ तर्फे विशेष पथक तयार करण्यात आले.
आणि गुरुवार १८ जुलै रोजी कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम, या ठिकाणी सापळा रचुन कक्ष ५ च्या पथकाने अल्पवयीन मुलींना फुस लावुन देहविक्रीकरीता आणणा-या २ महीला व १ पुरुष असे ३ आरोपीतांना ताब्यात घेतले. मुंबई गुन्हे शाखेच्या या यशस्वी कामगिरीमुळे आरोपींच्या ताब्यात असलेल्या २ अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. या गुन्हयातील तीनही आरोपीतांना अटक करण्यात आली असुन कुर्ला पोलीस ठाणे येथे पुढील तपास चालु आहे.
सदरची यशस्वी कामगीरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गुन्हे शाखा, कक्ष ५ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.