१०० करोड रूपये किमतीच्या ६० किलो मेफेड्रोनची फॅक्टरी सील
सलाहुद्दीन शेख
मुंबई गुन्हे शाखेकडून (Mumbai Crime Branch) १६ करोड किंमतीचा ८ किलो मेफेड्रोन (एमडी) (8 kg mephedrone (MD) drug) अंमली पदार्थ साठा बाळगणाऱ्या दोन आरोपीस अटक करण्यात आली असून सोलापुर येथिल मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ निर्माण करणाऱ्या फॅक्टरी मधुन अंदाजे १०० करोड रूपये किंमतीचा सुमारे ५० ते ६० किलो निर्माणाधिन मेफेड्रोन (एमडी) च्या कच्च्या साठयासह फॅक्टरी सील (approximately Rs.100 crore from the Solapur ethyl mephedrone (MD) drug manufacturing factor) करण्यात आली आहे.
अंमली पदार्थाच्या वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याकरिता मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) विशेष मोहिम हाती घेतली आहे. या दृष्टिने प्रयत्न करीत असतांना खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन इसम मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाचा मोठा साठा घेवून येणार आहेत, अशी विश्वसनीय बातमी कक्ष ९, गु. प्र.शा., गु. अ. वि., मुंबई चे प्रभारी पोलीस निरिक्षक दया नायक यांना प्राप्त झाली. सदर माहितीची प्रत्यक्ष खातरजमा केल्यानंतर कक्ष ९ च्या पथकाने खळा मैदान, स्मशानभुमीच्या बाजूला, कार्टर रोड, खारदांडा, खार पश्चिम, मुंबई येथे सापळा रचून ०२ आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे खालील प्रमाणे अंमलीपदार्थ मिळून आले.
१) एक ३२ वर्षीय पुरुष आरोपीच्या ताब्यातून एकुण २ किलो ५४७ ग्रॅम एम.डी., किंमत रू.५,०९,४०,०००/- (पाच करोड नऊ लाख चाळीस हजार रू.)
२) एक २७ वर्षीय पुरुष आरोपीच्या ताब्यातून एकुण २ किलो ५४२ ग्रॅम एम.डी., किंमत रू.५,०८,४०,०००/- (पाच करोड आठ लाख चाळीस हजार रू.)
सदर मिळून आलेल्या एकुण ५.०८९ किलो ग्रॅम वजनाच्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजार भावाप्रमाणे १० करोड १७ लाख ८० हजार रूपये एवढी किंमत आहे. वर नमुद अंमली पदार्थाचा साठा जप्त करून आरोपीविरोधात या प्रकरणी गु. प्र. शा., गु. अ. वि. वि. स्था. गु.र. क्र. ७९ / २०२३ (खार पोलीस ठाणे गुरक्र. ८०४/२०२३) कलम ८ (क), २२ (क), २९ एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये सदर गुन्हयाचा तपास कक्ष ९ कडून करण्यात येत आहे.
तपासादरम्यान सदर आरोपींकडे कौशल्यपुर्ण तपास करण्यात आला. त्यात त्यांनी मेफेड्रोन (एमडी) मोठया प्रमाणात तयार करण्याकरिता सोलापुर येथिल चिंचोली एमआयडीसी परिसरात एक कारखाना / फॅक्टरी सुरू केल्याचे सांगीतले. त्यांची फॅक्टरी कायदेशिर बाबींची पुर्तता करून सील करण्यात आली आहे. या दरम्यान सदर फॅक्टरीमध्ये एकुण ३.००६ किलो तयार मेफेड्रोन (एमडी) मिळून आला असुन सदर अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजार भावाप्रमाणे ०६ करोड ०१ लाख २० हजार रूपये एवढी किंमत आहे. सदर फॅक्टरीमध्ये अंदाजे १०० करोड रूपये किंमतीचा सुमारे ५० ते ६० किलो निर्माणाधिन मेफेड्रोन (एमडी) चा कच्चा साठा देखील मिळून आलेला आहे.
सदर एकुण तपासात अदयापपर्यंत सदर दोन आरोपीकडून तसेच त्यांच्या सोलापुर येथील फॅक्टरीमधुन रू. १६ करोड १९ लाख एवढ्या किमतीचे एकुण ८.०९५ किलो तयार मेफेड्रोन (एमडी) व अंदाजे १०० करोड रूपये किंमतीचा सुमारे ५० ते ६० किलो निर्माणाधिन मेफेड्रोन (एमडी) चा कच्चा साठा देखील मिळून आलेला आहे.
सदर दोन्ही अटक आरोपींना दिनांक १४/१०/२०२३ रोजी विहित वेळेत मा. न्यायालयासमक्ष रिमांडकरिता हजर करण्यात आले असून त्यांना दिनांक १९/१०/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. पोलीस सह आयुक्त श्री. निशिथ मिश्र (आर्थिक गुन्हे), अतिरिक्त कार्यभार (गुन्हे), मा. अपर पोलीस
आयुक्त (गुन्हे) श्री. शशि कुमार मीना, मा. पोलीस उप-आयुक्त (प्र- १) श्री. राज तिलक रौशन, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण- पश्चिम) श्री. महेश देसाई, यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. दया नायक, पोनि श्री. सचिन पुराणिक, पोनि श्री. दिपक पवार, सपोनि श्री. उत्कर्ष वझे, सपोनि श्री. महेंद्र पाटील, पो. ह. सुभाष शिंदे, पो. ह. सुनिल म्हाळसंक, पो.ह. संजय भोसले, पो. ह. जितेंद्र शिंदे, पो. ह. दत्तात्रय कोळी, पो.ह. सचिन राऊत, पो.ह. संतोष लोखंडे, पो.ह. महेश मोहिते, पो.ह. राहुल पवार, पो. ह. बाबासाहेब शेळके, पो. ह. विनय चौगुले, पो.शि. वैभव पाटील, म.पो.शि. साधना सावंत, पो.शि. प्रशांत भुमकर, पो.शि.अमोल सोनवणे, पो.शि. शार्दूल बनसोडे, पो.शि. राकेश कदम, पो.शि. सुशांत गवते, म.पो.शि. प्राजक्ता धुमाळ, पो.शि. गितेश कदम, पो. ह. चा. विनायक परब, पो.ह. चा. अविनाश झोडगे, पो. ना.चा. शशिकांत निकम, पो.ह. प्रशांत साळवी, पो. ह. स्वप्नील गुरव यांनी पार पाडली आहे.