गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींकडून तब्बल ३५ मोबाईल केले हस्तगत
एस. डी. चौगुले
गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींकडून ३५ मोबाईल हस्तगत करण्यात कुलाबा पोलिसांना यश आले आहे.
दिनांक ०८.१०.२०२३ रोजी सकाळी ०७.०० ते ०७.१५ वा. चे दरम्यान तक्रारदार हे ससून डॉक येथील फिश जुना धक्का येथे मासे खरेदी करिता आले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे पँटचे डाव्या खिश्यामध्ये ठेवलेला सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी एस २३ अल्ट्रा हिरव्या रंगाचा मोबाईल चोरून नेल्याने कुलाबा पोलीस ठाणेस गु.र.क्र. २३६ / २०२३ कलम ३७९ भा.द.वि. अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलाबा पोलीस ठाणेच्या पोलीस पथकास ससून डॉक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व कौशल्यपुर्ण तपासामध्ये ३ इसम हे संशयित वाटल्याने प्राप्त फुटेजच्या आधारे संशयित इसमांचा शोध घेतला असता, इसम नामे एमडी वारीस एमडी सरफराज, वय १९ वर्ष रा. ठी. जामुरीया एम. बरधामन, निंघा, पश्चिम बंगाल व एक विधीसंघर्ष बालक वय १३ वर्ष हे मिळून आले. नमुद संशयीत इसमांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता, एमडी वारीस याचेकडे चोरी गेलेला मोबाईल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपी एमडी वारीस याची पोलीस कस्टडी दरम्यान त्याचेकडून एकूण ३३ मोबाईल किंमत ६,८०,००० रु. चे जप्त करण्यात आले असून, यात त्याचे इतर २ साथीदार यांचा शोध सुरु आहे. आरोपीकडून जप्त मोबाईल हे त्याने मालाड, बोरीवली, कांदिवली परिसरात, तसेच गणपती विसर्जनमध्ये त्याचे साथीदारांसोबत चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
नमुद गुन्हयात जप्त मोबाईलचे IMEI क्रमांकवरून मुळ मालकांचा तसेच त्यासंदर्भात कोणत्या पोलीस ठाणेस तक्रार प्राप्त आहेत काय बाबतचा अधिक तपास चालू आहे.
सदरची कामगिरी डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई, डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १, श्री. शशिकिरण काशिद, सहा. पोलीस आयुक्त, कुलाबा विभाग व विजय हातिसकर, वपोनि. कुलाबा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख सहा. पो. निरीक्षक स्वप्निल वाघ, पो.शि. पुरे, भोसले, अत्रे यांनी केली आहे.