![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231018-WA0026-1.jpg)
राजस्थान येथून केली अटक
![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231018-WA0026.jpg)
संदिप कसालकर
अंधेरी पोलीस ठाणेकडुन राजस्थान येथील आरोपी अटक करून अंधेरी व मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथील बुलेट चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन बडीसादडी पोलीस ठाणे, चित्तौरगढ, राजस्थान येथे १०० किलो अफिम दोडा पोस्ट मध्ये दोन वर्षापासुन पाहिजे असलेल्या आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
फिर्यादी यांनी अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथे समक्ष येऊन कळविले की, दि. ०५/०८/२०२३ रोजी रात्री २३.०० वा. ते दि. ०६/०८/२३ रोजी सकाळी ०८.०० वा. चे दरम्यान साईप्रसाद हॉटेलच्या बाजुला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अंधेरी पुर्व, मुंबई या ठिकाणी पार्क केलेली त्यांची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटारसायकल क्रमांक MH-02 FM 6096 ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केली असल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून अंधेरी पोलीस ठाणे येथे गु.र.क्र ४१९ / २३ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हयाचा तपास पोउपनि किशोर परकाळे व पथक करीत होते. सतत दोन महिने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपास करून अंधेरी पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन आरोपीतांस पुणे येथून ताब्यात घेऊन त्यांना वर नमुद गुन्हयातील सहभागावरून अटक केली. अटक आरोपी यांच्याकडुन राजस्थान येथुन अंधेरी पोलीस ठाणे गुरक्र. ४१९/२०२३ कलम ३७९ भादवि या गुन्हयातील रॉयल एनफिल्ड कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH-02 FM 6096 व मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गु.र.क्र १५८ / २३ कलम ३७९ भादवि या गुन्हयातील मोटारसायकल क्रमांक MH-47 AH 1146 अशा दोन रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटार सायकल राजस्थान येथुन हस्तगत करण्याची यशस्वी कामगिरी अंधेरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेली आहे.
अटक आरोपी नामे हिम्मत भैरूलाल गुज्जर हा बडीसादडी पोलीस ठाणे, चित्तौरगढ़, राजस्थान येथे १०० किलो अफिम दोडा पोस्ट मध्ये दोन वर्षापासुन पाहिजे आरोपी असुन त्याबाबत सदर पोलीस ठाणेस अवगत करण्यात आले आहे.
अटक आरोपीतांचे नाव व पत्ता
१) रमेश राधेश्याम मेनारिया वय ३१ वर्षे व्यवसाय – जेवण बनविणे रा. ठी रूम नं १४१, तुलशीवाडी झोपडपट्टी, अप्रोच रोड, आरटीओ ऑफिसच्या पाठीमागे, ताडदेव, मुंबई ( मुळ गाव – गाव करसाना, ता. डुंगला जि. चित्तौडगड राज्य – राजस्थान ) २) हिम्मत भैरूलाल गुज्जर वय ३२ वर्षे व्यवसाय – आईस्क्रीम विक्री रा. ठी आरिया रेसिडेंन्सी, गट नं ६४७, लाईफ लाईन हॉस्पिटल समोर, केसनंद फाटा, वाघोली पुणे ( मुळ गाव- गाव पालोद, ता. डुंगला जि. चित्तौडगड राज्य – राजस्थान ) ३) हिरालाल किशनलाल अहिर वय २४ वर्षे व्यवसाय – पाणीपुरी विक्री रा. ठी आरिया रेसिडेंन्सी, गट नं ६४७, लाईफ लाईन हॉस्पिटल समोर, केसनंद फाटा, वाघोली पुणे ( मुळ गाव – गाव मोरवन, ता. डुंगला जि. चित्तौडगड राज्य – राजस्थान)
आरोपीतांकडुन उघडकीस आलेले गुन्हे
१) मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे गु.र.क १५८ / २३ कलम ३७९ भादवि
२) बडीसादडी पोलीस ठाणे, चित्तौरगढ, राजस्थान गु.र.क्र २२६/२१ कलम ८, १५ एनडीपीएस अॅक्ट
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त (का व सु) श्री. सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री परमजित सिंह दहिया, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० श्री दत्ता नलावडे, मा. सहायक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग डॉ. शशिकांत भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली व. पो. नि श्री संताजी घोरपडे, पो. नि. गुन्हे श्री बालाजी दहिफळे यांचे प्रत्यक्ष देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उप. निरीक्षक किशोर परकाळे, पो.ह. पेडणेकर, पो. ह सुर्यवंशी, पो.शि. सोनजे, पो. शि जाधव, पो. शि लोंढे, पो. शि कापसे, पो. शि मोरे, तांत्रिक मदत पो. ह विशाल पिसाळ यांनी पार पाडली आहे.