प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक ०३/०९/२०२५ रोजी दुपारी ०४:३० वाजण्याच्या सुमारास चामुण्डा सोसायटी गेट जवळ, ९० फिट रोड, ठाकुर्ली डोंबिवली (पूर्व) येथुन वृध्द महिला पायी चालत जात असताना मोटार सायकलवर दोन इसम येवून वृध्द महिलेच्या गळ्यातील चैन खेचुन पळून गेले. त्याबाबत डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस उप आयुक्त साो. श्री. अतुल झेंडे, व सहा पोलीस आयुक्त साो. श्री. सुहास हेमाडे यांनी केलेल्या सुचनांप्रमाणे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जावदवाड यांनी आरोपीचा छडा लावण्यासाठी व शोध घेणेकामी डोंबिवली पोलीस ठाण्याचे शोध पथकांतील सपोनि. मुपडे व पोउनि. चव्हाण यांच्या दोन टिम तयार करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नमुद गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळाचे व इतर ठिकाणाचे एकूण १०६ सी.सी.टिव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता आरोपी याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्र. एमएच-२०/ एफआर-१८५१ ही असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे मोटार सायकल मालकास संपर्क केला असता त्याने सांगितले की, सदर मोटार सायकल त्यांने दिनांक २२/०८/२०२५ रोजी नारायण पेठ, पुणे येथे पार्क केली असुन सदर ठिकाणाहुन ती चोरीस गेली आहे त्याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंद आहे. यावरून समजले की, दाखल गुन्ह्यातील आरोपी यांनी सदर मोटार सायकल चोरी करून डोंबिवली येथे येवुन चैन स्नॅचिंग केली आहे. त्या अनुषंगाने सदर आरोपी यांचा गुन्हा केलेल्या ठिकाणाचा माग घेवुन त्यांच्या बाबत अधिक माहिती प्राप्त केली. तपासादरम्यान गुन्हे तपास पथकांनी अथक परिश्रम घेवून सदर आरोपी हे सुनिल नगर, डोंबिवली (पूर्व) येथे येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा लावुन सदर संशयीत्त इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नावे विचारता त्यांनी त्याची नावे १) अभय सुनील गुप्ता, (वय: २१ वर्षे), राहणार. कुमारनटोला, खुटार रोड, गोला गोकर्णनाथ, ठाणे. गोला गोकर्णनाथ, जिल्हा. लखीमपूर खिरी, उत्तर प्रदेश, २) अभिषेक ओमप्रकाश जौहरी, (वय: ३२ वर्षे), राहणार, खोली क्रमांक १४/१५, हरिहरगंज, ठाणे. कोतवाली, फतेहपूर, जिल्हा फतेहपूर, उत्तर प्रदेश, ३) अर्पीत उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला, (वय: २७ वर्षे), राहणार, खमरीया, ठाणे, खेरी, जिल्हा. लखीमपुर खिरी, उत्तरप्रदेश, अशी असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेता अभय सुनिल गुप्ता, याच्याकडे १ गावठी रिव्हॉलव्हर व अभिषेक ओमप्रकाश जौहरी, याच्याकडे ०४ जिवंत काडतूसं सापडले. तसेच त्यांच्या अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने मिळून आल्याने त्याबाबत अधिक चौकशी करता सदरचा मुद्देमाल हा डोंबिवली व मानपाडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदरची मोटार सायकल ही चोरीची असल्याने त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे, येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. आरोपी यांच्याकडे १ गावठी कट्टा व ०४ जिवंत काडतूसं मिळून आल्याने त्यांच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६८४/२०२५ आर्म ऍक्ट कलम ३(२५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे वरील आरोपीकडून पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१) ३०,०००/- रू. किंमतीचा एक देशी बनावटीचा गावटी क‌ट्टा..
२) ८,००० /- रू. किंमतीची, गावठी बनावटीची ०४ जिवंत काडतुसे..
३) ३७,२६०/- रू. किंमतीची, एक सोन्याची लगड, ४१४ ग्रॅम वजनाची..
(डोंबिवली पोलीस ठाणे गुरनं. ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३ (५)

४) २,१५.०१०/- रू. किंमतीचे, एक सोन्याचे मंगळसुत्र, २३.८९ ग्रॅम..
(मानपाडा पोलीस ठाणे गुरनं. १०५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५)

५) ९०,०००/- रू. किंमतीची. यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची नंबर एमएच-२०/ एफआर-१८५१ (विश्रामबाग पो.स्टे, पुणे, गुरनं १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३ (२)

तरी सदर ३ इसमांकडे वरिल प्रमाणे असा एकूण ३,८०,४२० /- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असुन नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत.

जिल्हा ठाणे
१) डोंबिवली पोलीस ठाणे गुरनं. क्रमांक ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९ (६). ३(५) मधील एक सोन्याची लगड, ४१४ ग्रॅम वजनाची..
२) मानपाडा पोलीस ठाणे गुरनं १०५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९ (४), ३(५) मधील एक सोन्याचे मंगळसुत्र, २३.८९ ग्रॅम वजनाचे, मध्यभागी दोन वाटया असलेले, अर्धवट तुटलेले..

पुणे जिल्हा
३) विश्रामबाग पो.स्टे. पुणे, गुरनं १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३ (२) मधील मॅट ब्लॅक रंगाची एक यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची मोटार सायकल क्र. एमएच-२०/एफआर-१८५१..
४) बिबेवाडी पोलीस ठाणे गुरनं. २१०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९(४) ३(५)
५) हडपसर पोलीस ठाणे गुरनं. ३६१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३(२)
६) हडपसर पोलीस ठाणे गुरनं. ७६३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०४(२) ३(५)

उत्तर प्रदेश राज्य येथे अटक आरोपी अभिषेक ओमप्रकाश जौहरी याच्यावर दाखल असलेले गुन्हे..
१) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. २६६/२०१९ शस्त्र अधिनियम कलम ३, २५ प्रमाणे..
२) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. क्र. २६९/२०१९ भादंवि. कलम ४११, ४१४, ४२०, ४६७, ४६८ प्रमाणे..
३) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. २६४/२०१९ भादंवि. कलम ३९, ४०२ प्रमाणे..
४) कोतवाली पोलीस ठाणे गुरनं. ५९६/२०१९ भादंवि. कलम ३९२, ४११ प्रमाणे..

तसेच आरोपी अर्पित ऊर्फ प्रशांत अवधेश शुक्ला याच्या विरुद्ध भादंवि. कलम ३०२ प्रमाणे उत्तरप्रदेश मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

वरील आरोपी यांची पोलीस कोठडी मंजूर असून त्याचा अधिक तपास पोउनि. प्रसाद चव्हाण करीत आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय जाधव, (पूर्व प्रादेशिक विभाग) कल्याण, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ कल्याण श्री. अतुल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. सुहास हेमाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वपोनि. श्री. गणेश जावदवाड, मा. पोनि. श्री. विक्रम गौड, मा. पोनि.(गुन्हे) श्री. राजेंद्र खेडकर डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. अच्युत मुपडे, पोउनि. प्रसाद चव्हाण, पोहवा. सुनील भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, पोकॉ. शिवाजी राठोड, नितीन सांगळे, राजेंद्र सोनावणे, देविदास पोटे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी यशस्वीरित्या केली आहे.